Share

IND vs SA Super 8 : सूर्याची मोठी खेळी, सलग ३ वेळा फ्लॉप ठरलेला ‘तो’ खेळाडू बाहेर; अशी असेल Playing 11!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता असून संजू सॅमसन आणि ईशान किशन सलामीला उतरू शकतात. पाहा संभाव्य प्लेइंग-११.

Published On: 

IND vs SA T20: अभिषेक बाहेर, संजू इन; पाहा Playing 11! | ind vs nz

विश्वचषकात सलग चार विजय मिळवून भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. पण सुपर-८ च्या पहिल्याच महासंग्रामात काही धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहेत का? क्रिकेट वर्तुळात सध्या याच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.

येत्या २२ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 World Cup 2026 चा अत्यंत महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या निर्णायक लढतीसाठी टीम इंडियाची रणनीती आता समोर येऊ लागली आहे. सलामीच्या जोडीत मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या अभिषेक शर्माला संघातून डच्चू मिळू शकतो. आफ्रिकेच्या तगड्या गोलंदाजीसमोर त्याला पुन्हा संधी देण्याचा धोका संघ व्यवस्थापन पत्करणार नाही.

IND vs SA Super 8

अभिषेकच्या एक्झिटमुळे आता संजू सॅमसन आणि ईशान किशन ही नवी जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते. संजूच्या आगमनाने टॉप ऑर्डरला एक वेगळीच मजबुती मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर फॉर्ममध्ये असलेला तिलक वर्मा आणि चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव संघाचा डोलारा सांभाळतील. मागच्या सामन्यात ३१ चेंडूत ६६ धावांची तुफानी खेळी करणारा शिवम दुबे पाचव्या स्थानावर फिक्स मानला जातोय.

डेथ ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंगची पॉवर हिटिंग आफ्रिकेच्या गोलंदाजांचा नक्कीच घाम फोडेल. गोलंदाजी विभागात मात्र कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. नेदरलँड्सविरुद्ध ३ षटकांत १४ धावा देऊन ३ बळी घेणारा वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर फिरकीची धुरा सांभाळतील. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी हुकमी एक्का जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्याच खांद्यावर असेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची संभाव्य Playing 11: ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही