📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

बिग बॉसमध्ये राखी सावंतचा गेम: राखी बाहेर जाणार म्हणताच हसले; ‘त्या’ एका ट्विस्टने उडाली मोठी खळबळ!

बिग बॉस मराठी ६ मध्ये राखी सावंत घराबाहेर जाणार या आनंदात असलेल्या स्पर्धकांना मोठा धक्का बसला. राखी थेट ‘उत्तराधिकारी’ बनल्याने घरात खळबळ उडाली आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant: राखीचा मोठा ट्विस्ट!

🕒 1 min read

‘बिग बॉस’च्या घरात कधी काय होईल, याचा काहीच नेम नसतो. जे स्पर्धक एकमेकांच्या जाण्यावर हसतात, त्यांच्यावरच रडण्याची वेळ कशी येते, याचा भन्नाट प्रत्यय Bigg Boss Marathi 6 च्या ताज्या भागात आलाय. ड्रामा क्वीन राखी सावंतच्या बाबतीत आता असा काही गेम पलटलाय की घरातील सदस्यांना अक्षरशः घाम फुटलाय.

भागाच्या सुरुवातीलाच राखीला घराबाहेर काढण्याची घोषणा झाली. बाऊन्सर्स तिला बाहेर नेण्यासाठी आले. हे पाहताच घरातील अनेक स्पर्धकांनी सुटकेचा निश्वास टाकला. काहींनी तर उघडपणे हसून आनंद साजरा केला. पण त्यांचा हा आनंद अगदी काही सेकंदांचाच ठरला. बिग बॉसने अचानक असा डाव टाकला की सर्वांचीच तंतरली.

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant

राखीला बाहेर काढण्याऐवजी चक्क घराची ‘उत्तराधिकारी’ घोषित करण्यात आलं! ही घोषणा होताच हसणारे चेहरे एकदम पडले. विनोदवीर सागर कारंडेला बोलावून राखीला या पदाचा मुकूट घालण्यास सांगण्यात आलं. आता या नव्या अधिकारामुळे घरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राखी घरात आल्यापासून तिने रुचितासोबत जोरदार भांडण केलंय आणि तन्वीला प्राजक्ताविरुद्ध भडकवण्याचं कामही चोख बजावलंय.

एकीकडे घरातील सदस्य राखीच्या दहशतीखाली असताना, दुसरीकडे सागर कारंडे मात्र प्रचंड खुश आहे. तो राखीसोबत सतत फ्लर्ट करताना दिसतोय. आता ‘उत्तराधिकारी’ बनलेली राखी कोणाकोणाची विकेट काढणार आणि घरातील समीकरणं कशी बदलणार? याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!