🕒 1 min read
सोशल मीडियावर कधी कुणाचं नशीब चमकेल आणि कधी कुणावर आभाळ कोसळेल, हे सांगता येत नाही. याचाच भयंकर प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. ‘हिरव्या पोळी’च्या व्हिडिओने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली ‘प्रसिका’ (Prasad and Deepika) ही जोडी सध्या एका मोठ्या डिजिटल संकटात सापडली आहे.
गेल्या १० वर्षांपासून प्रेक्षकांना हसवणाऱ्या प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि एक्स (ट्विटर) वरील सर्व व्हेरिफाइड अकाउंट्स कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सस्पेंड करण्यात आले आहेत. या धक्क्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. लाखो फॉलोअर्स आणि हजारो व्हिडिओंचं त्यांचं साम्राज्य एका क्षणात ‘ब्लॅकआउट’ झालंय.
Prasika Account Suspended
२०१४ मध्ये ‘Ur Indian Consumer’ (UIC) चॅनेलपासून या दोघांनी शून्यातून सुरुवात केली होती. टिकटॉकवर अवघ्या ६ महिन्यांत १० लाख फॉलोअर्स कमवत त्यांनी इतिहास रचला होता. दीपिकाच्या ताटातली ‘हिरवी पोळी’ आणि ‘लंचबॉक्स विथ प्रसिका’ या सिरीजने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. ‘Upstox’ सारख्या मोठ्या ब्रँडने त्यांना आयपीएलसाठी आमंत्रित केलं होतं, जिथे त्यांच्या व्हिडिओंनी ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले होते.
पण, “नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या!” ही प्रसादची प्रेमळ साद आता अचानक थांबली आहे. प्रसादने एका भावूक व्हिडिओतून हा मोठा गौप्यस्फोट केला. मेटाने (इन्स्टाग्राम आणि फेसबुक) ‘कम्युनिटी गाईडलाईन्स’चं कारण देत ही कारवाई केली असली, तरी नेमकं कोणतं उल्लंघन झालं, हे कुणालाच माहिती नाही.
“१० वर्षांची मेहनत एका रात्रीत हिरावली गेली,” अशी खंत प्रसादने व्यक्त केली आहे. याचा फटका त्यांच्या पूर्ण टीमच्या रोजीरोटीला बसणार आहे. सध्या हे कपल तांत्रिक आणि कायदेशीर मार्गाने अकाउंट्स परत मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. या कठीण काळात चाहते मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- हार्दिक पांड्याचं दुसरं प्रेम: मध्यरात्री शेअर केला ‘तो’ बोल्ड फोटो; विश्वचषकातच उडाली मोठी खळबळ!
- “हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी….”; आस्ताद काळेचा भाजप नेत्यावर संताप; व्हिडीओ शेअर करत म्हणाला….
- ‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











