Share

प्रसाद वेदपाठकची मनसेकडे धाव; घाटकोपरच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्टीवरून वाद चिघळला, मनसे आक्रमक होणार?

जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीला विरोध केल्यानंतर प्रसाद वेदपाठकला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी त्याने आता मनसेची मदत मागितली आहे.

Published On: 

Prasad Vedpathak Controversy - Prasad meeting MNS leaders over Jain white line issue

तुमच्या राहत्या सोसायटीत जर अचानक रहिवाशांची परवानगी न घेता एखादी पांढरी पट्टी मारली गेली, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? घाटकोपरमध्ये याच एका पांढऱ्या पट्टीवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच विकोपाला गेलाय.

सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) याने जैन साध्वींसाठी मारण्यात आलेल्या या पट्टीला कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र, हा विरोध केल्यानंतर त्याला थेट धमक्या मिळू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्याने आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे (MNS) धाव घेतली आहे.

Prasad Vedpathak Controversy

या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रसाद आज दुपारी १२ वाजता मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची थेट भेट घेणार आहे. तत्पूर्वी, त्याने एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट करत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुंबई पोलिसांना टॅग करून सुरक्षेची मागणी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनसेकडून प्रसादला भक्कम पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे.

हा सगळा प्रकार घाटकोपरच्या ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीत घडला होता. प्रसादच्या दाव्यानुसार, सोसायटीत राहणाऱ्या इतर सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बिल्डिंगच्या आवारात ही पांढरी पट्टी मारण्यात आली होती. यासंदर्भात त्याने एक व्हिडिओ शेअर करून जाहीर संताप व्यक्त केला होता.

दुसरीकडे, भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी जैन समुदायाची बाजू घेत प्रसादच्या भूमिकेला जोरदार विरोध केला होता. वाढत्या वादानंतर अखेर ती पांढरी पट्टी हटवण्यात आली. पण त्यानंतर सुरू झालेल्या धमक्यांच्या सत्रामुळे आता हे प्रकरण थेट मनसेच्या दरबारात पोहोचलंय. आता या भेटीनंतर मनसे नेमकी कोणती ॲक्शन घेते आणि प्रसादला नक्की कुणाकडून धमक्या येत आहेत, याचा उलगडा लवकरच होईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही