गणपतीत आता गरबा खेळायचा का? अंबानी, अदानींच्या प्रायोजकत्वावरून संदीप देशपांडेंचा संताप

अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी गणेशोत्सवात शिरकाव केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लालबागचा राजा आणि चिंतामणी मंडळावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Sandeep Deshpande criticizing Lalbaugcha Raja over Ambani Adani sponsorship.

Sandeep Deshpande: बाप्पाच्या मंडपात आता आपण गरबा खेळायचा का? सध्या मुंबईत याच प्रश्नावरून मोठं वादळ उठलंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळांना खडेबोल सुनावले आहेत.

गेल्या वर्षी ‘लालबागचा राजा’ मंडळाने चक्क अनंत अंबानी यांची सल्लागार पदी नियुक्ती केली होती. संपूर्ण लालबागमध्ये रिलायन्सच्या जाहिराती झळकल्या. आता यंदा त्यात आणखी एका बड्या उद्योगपतीची भर पडलीये. ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’ मंडळाने यंदा थेट अदानी समूहाशी जाहिरातींचा करार केलाय. याच कॉर्पोरेट स्पर्धेवरून आता संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त करत लालबागचे अध्यक्ष सुधीर साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sandeep Deshpande on Ganeshotsav

सण मराठी मातीचा, मग गुजराती कंपन्यांच्या हातात का?

“गणेशोत्सव हा आमचा हक्काचा सण आहे. पण मंडळंच जर अशा कॉर्पोरेट वॉरचा भाग होत असतील, तर हे मोठं दुर्दैव आहे,” असं देशपांडे स्पष्ट म्हणाले. गणेशोत्सवासाठी पैसे लागतात हे नक्की. पण आज लालबागच्या राजाच्या चरणी भाविक स्वतःहून कोट्यवधी रुपयांची देणगी देतात. मग तिथे अंबानींची काय गरज? अनंत अंबानी असा कोणता मोठा सल्ला देतात जो गेली अनेक वर्षं मंडळाला मिळाला नाही? असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेत.

अंबानींना बघून आता अदानी आले, उद्या जेएसडब्ल्यू आणि गोदरेज येतील. मग गणेशोत्सव मंडळ हे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट वॉरचं ठिकाण बनवायचं आहे का? हा सण मराठी मातीचा आहे. तो आपण गुजराती कंपन्यांच्या आणि उद्योगपतींच्या हातात का देतोय? मंडळातील मराठी तरुणांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीय, अशी सादही त्यांनी घातली. वेळीच भान ठेवलं नाही तर भविष्यात लालबागचा राजा ‘अंबानी गणपती’ आणि चिंतामणी ‘अदानी गणपती’ म्हणून ओळखला जाईल, अशी मार्मिक भीती त्यांनी व्यक्त केली.

याचबरोबर देशपांडेंनी उंच मूर्तींच्या वाढत्या स्पर्धेवरही बोट ठेवलं. मूर्ती किती उंच असावी याला काही मर्यादा आहेत की नाही? उंच मूर्ती उभारून आपण तिची खरोखर निगा राखू शकतो का? नुकत्याच घडलेल्या दुर्घटनांवरून त्यांनी चिंता व्यक्त केली. दोन फुटांचा गणपती आपल्या इच्छा पूर्ण करत नाही का? असे अनेक टोकदार प्रश्न विचारत त्यांनी या कॉर्पोरेट स्पर्धेची हवाच काढून घेतली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही