🕒 1 min read
राजकारणी लोकांसाठी सर्वसामान्यांचे हाल म्हणजे निव्वळ थट्टेचा विषय असतो का? जेव्हा सामान्य माणूस हतबल असतो, तेव्हा नेते त्यांच्या अगतिकतेचा कसा फायदा घेतात, याचा संतापजनक प्रत्यय पुन्हा एकदा आलाय.
रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आस्ताद काळेचा (Aastad Kale) पारा आता एका नेत्याच्या वक्तव्यावरून चांगलाच चढला आहे. निमित्त ठरलंय ते भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांचा नव्याने समोर आलेला एक जुना व्हिडीओ.
Aastad Kale on Manoj Tiwari
या व्हिडीओने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून, नेटकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झालाय. देशात जेव्हा नोटबंदीची घोषणा झाली होती, तेव्हा जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वसामान्यांनी बँका आणि एटीएमबाहेर रात्रंदिवस रांगा लावल्या होत्या. त्याच रांगेत उभ्या असलेल्या हतबल जनतेची मनोज तिवारी कशी थट्टा करत होते, हे आता चव्हाट्यावर आलंय.
एका खासगी पार्टीत गोल टेबलावर बसून मनोज तिवारी इतर नेत्यांसोबत हा किस्सा रंगवून सांगत आहेत. “मी एटीएमच्या रांगेतल्या लोकांना देशभक्तीचा डोस पाजला. ‘तुम्ही देशासाठी कष्ट सोसत आहात, तुम्हीच खरे देशभक्त आहात’ असं म्हणताच ते लोक हसू लागले आणि टाळ्या वाजवू लागले,” असं तिवारी हसत-खेळत सांगत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय.
हाच माजोरडेपणा पाहून आस्ताद काळेने थेट फेसबुकवर तो व्हिडीओ शेअर केला आणि नेत्यांचे वाभाडे काढले. “हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी.. नोटबंदी नावाचा राष्ट्रीय पीआर स्टंट सपशेल फसलाच होता. त्यात हे लोक, घाबरून रांगा लावून उभ्या असलेल्या नागरिकांबद्दल असे भाष्य करत होते,” या जळजळीत शब्दांत आस्तादने सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले आहेत.
आस्तादच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता राजकारण तापलं आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने यावरून भाजपला धारेवर धरलंय. जनता रांगेत मरणयातना भोगत असताना नेते मात्र त्यांची मस्करी करत होते, अशी घणाघाती टीका विरोधकांनी केली आहे. आता या वाढत्या वादानंतर मनोज तिवारी काही स्पष्टीकरण देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!
- Stock Market : १० रुपयांच्या शेअरने अख्खं मार्केट गाजवलं; ‘ती’ एक बातमी आली अन् रॉकेट झाला!
- Maharashtra Kesari : पुण्यात पुन्हा शड्डू घुमणार; ६८ व्या केसरीचा थरार ‘या’ तारखेला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











