Share

’50 हजाराचं सीरम तर 75 हजाराचं….’, निक्की तांबोळीच्या सौंदर्याचं ‘हे’ गुपित ऐकून फिरतील डोळे!

निक्की तांबोळीच्या मेकअपचा खर्च ऐकून डोळे फिरतील. लंडनहून येणाऱ्या तिच्या एका सीरमची किंमत ५० हजार तर मॉइश्चरायझर ७५ हजार रुपये आहे.

Published On: 

Nikki Tamboli Makeup: बाबो! ५० हजाराचं सीरम अन्... निक्कीचा लंडनवाला थाट!

दिसायला सुंदर असावं, असं कोणाला वाटत नाही? पण त्यासाठी कोणी पाण्यासारखा पैसा खर्च करतं, हे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसेल का? बिग बॉस फेम निक्की तांबोळीच्या (Nikki Tamboli) बाबतीत हा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. तिच्या सौंदर्यावर होणारा अवाढव्य खर्च ऐकून सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर निक्की सध्या ‘द ५०’ (The 50) या रिअॅलिटी शोमध्ये धुमाकूळ घालत आहे. याच शोमध्ये तिच्या श्रीमंतीचा आणि हाय-फाय नखऱ्यांचा अंदाज प्रेक्षकांना आला. शोमध्ये ‘लायन’ने स्पर्धकांना एक टास्क दिला होता, ज्यात घरातील सदस्यांचे सामान चरायचे होते.

Nikki Tamboli Makeup

पण निक्कीने इथे वेगळाच गेम खेळला. तिने इतरांच्या वस्तू न चोरता आपले स्वतःचे ब्रँडेड प्रॉडक्ट्स लायनला दिले, ज्यामुळे मनी पॉटमध्ये तब्बल १ लाख रुपये जमा झाले.

यावेळी निक्कीला रडू कोसळले, पण त्याचवेळी तिचा सहस्पर्धक अरबाजने निक्कीच्या या महागड्या वस्तूंचा मोठा गौप्यस्फोट केला. तो म्हणाला, “निक्की दुसऱ्या कोणाच्या वस्तूंना हात लावणार नाही, ती स्वतःच्या वस्तू देईल. कारण तिचं सामान साधंसुधं नाही, तर थेट लंडनवरून येतं.”

अरबाजने पुढे जी माहिती दिली, ती ऐकून सर्वच अवाक झाले. त्याने सांगितले की, “निक्की जे सीरम वापरते, त्याची किंमत ५० हजार रुपये आहे. तर तिच्या एका मॉइश्चरायझरची किंमत ७५ हजार रुपये आहे.” निक्की आपल्या स्किनकेअरवर लाखो रुपये उधळते, हे आता उघड झालं आहे. तिच्या या महागड्या ‘लंडन लूक’ची आणि लाखो रुपयांच्या नखऱ्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही