बारामती, 19 ऑक्टोबर: बारामती विमानतळ परिसरातील गोजुबाबी येथे राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना दिले आहेत.
रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता दौंडला जात असताना सूर्यवंशी गोजुबाबी येथे जमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी थांबले होते. त्यावेळी बुके देण्याच्या बहाण्याने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेवर स्पष्ट भूमिका मांडताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.” नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणालाही खेळू दिले जाणार नाही आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सूर्यवंशी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
कोट्यवधींची उलाढाल असणाऱ्या राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी (Rana Suryawanshi) हे मूळचे बारामती तालुक्यातील माळेगावचे रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास असून त्यांचे शिक्षण क्षेत्रातही काम आहे. त्यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे; मात्र हल्ल्याच्या वेळी ही सुरक्षा त्यांच्यासोबत नव्हती, केवळ खासगी अंगरक्षक उपस्थित होते. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातही सूर्यवंशी यांच्यावर असाच हल्ला झाला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘काटकोन त्रिकोण’च्या प्रयोगादरम्यान डॉ. मोहन आगाशेंना रुग्णालयात करावं लागलं होतं दाखल; केतकी थत्तेने सांगितला ‘तो’ प्रसंग
- टायगर श्रॉफवरील हल्ल्यासाठी विदेशी पिस्तुलाचा वापर, राजस्थानातून तिघे संशयित ताब्यात
- न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकाश चोप्राचा मोठा दावा; वैभव सूर्यवंशीला ‘या’ ३ खेळाडूंच्या जागीच मिळू शकते संधी
Quick Answers
बारामती विमानतळ परिसरातील गोजुबाबी येथे सूर्यवंशी जमिनीचा प्लॉट पाहण्यासाठी थांबले असताना, बुके देण्याच्या बहाण्याने आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
सुनेत्रा पवार यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना दिले आहेत.
राणा सूर्यवंशी यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे; मात्र हल्ल्याच्या वेळी ही सुरक्षा त्यांच्यासोबत नव्हती आणि केवळ खासगी अंगरक्षक उपस्थित होते.
हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






