सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम

दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबतची भेट सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले असून, आमदारांमध्ये विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

Published On: 

Dattatray Bharne clarifies meeting with Sunetra Pawar

पुणे, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही कोणतीही अधिकृत पक्षाची बैठक नसून केवळ एक सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनंतर सुनेत्रा पवार यांची भेट झाली नव्हती. तसेच त्या आजारी होत्या, त्यामुळे आमदारांनी त्यांची भेट घेतल्याचे भरणे यांनी सांगितले. या भेटीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलणे झाल्याच्या चर्चा त्यांनी ठामपणे फेटाळून लावल्या. “आज विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना दिले आहेत, त्यामुळे हा विषय तेव्हाच संपला आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, आमदारांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नसून सर्वजण सुनेत्रा पवारांच्या निर्णयाला बांधील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही