Share

‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडून जायचो…..’, आमिर खानसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली पूजा भट

पूजा भट्टने ‘दिल है की मानता नही’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमिर खानसोबत असलेल्या तिच्या नात्यावर आणि अफेअरच्या अफवांवर आता स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

Published On: 

Pooja Bhatt reveals secret about Aamir Khan relationship in Dil Hai Ki Manta Nahin

‘दिल है की मानता नही’ हा सिनेमा आठवतोय? ९० च्या दशकात तरुणाईला वेड लावणारी पूजा भट्ट आणि आमिर खानची (Aamir Khan) जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात होती का? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला कधीतरी पडला असेल.

आता तब्बल ३३ वर्षांनंतर स्वतः पूजा भट्टने (Pooja Bhatt) या जुन्या प्रकरणावर मौन सोडलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आमिरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल धक्कादायक माहिती दिली असून अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.

Pooja Bhatt Aamir Khan relationship

१९९१ साली आलेल्या ‘दिल है की मानता नही’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की लोक आवडीने पाहतात. स्वतःचे वडील महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात पूजा आणि आमिरची भन्नाट रोमँटिक केमिस्ट्री पडद्यावर दिसली होती.

त्यामुळेच, त्यावेळी हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता पत्रकार विकी लालवानी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पूजाने या सर्व अफवांवर स्पष्टीकरण दिलंय.

“आमिरसोबत माझं नातं खूप उत्साही आणि खोडकरपणाचं होतं. आम्ही सेटवर एकत्र काम करताना खूप मस्करी करायचो. अगदी टॉम अँड जेरीसारखे आम्ही सतत भांडायचो,” अशी जुनी आठवण पूजाने हसत हसत सांगितली.

अफेअरच्या प्रश्नावर ती अगदी स्पष्टपणे म्हणाली, “मी त्यावेळी खूप आकर्षक होते हे नक्कीच, आणि मला आमिर खान आवडायचा हेही खरंय. जेव्हा सीनसाठी कॅमेरा सुरु व्हायचा, तेव्हा आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचो.”

पण हे प्रेम फक्त पडद्यापुरतंच मर्यादित होतं, असंही तिने आवर्जून नमूद केलं. “आमच्यातली ती भन्नाट केमिस्ट्री फक्त कॅमेऱ्यासमोर होती. कॅमेरा बंद झाल्यावर त्यापलीकडे आमच्यात असं काहीच नव्हतं,” असा मोठा खुलासा करत तिने या जुन्या चर्चांना आता कायमचा पूर्णविराम दिलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install