🕒 1 min read
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. त्याने नुकतंच तिसरं लग्न केलं, पण आता याच लग्नावरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
आमिरला फक्त हिंदू मुलीच का आवडतात? असा थेट आणि खडा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. बिहारच्या फोर्ब्सगंज परिसरात नुकतंच बजरंग दलाच्या (Bajrang Dal Protest) कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमिर खानचा पुतळा जाळला.
Aamir Khan Third Marriage
‘आमिर खान मुर्दाबाद’ आणि ‘आमिर खान जिहादी, भारत सोडून जा’ अशा जोरदार घोषणाबाजीने हा परिसर दणाणून गेला होता. तिसऱ्यांदा हिंदू मुलीशी लग्न करून आमिरने ‘लव्ह जिहाद’ केल्याचा खळबळजनक आरोप आंदोलकांनी केला आहे.
‘ऑलवेज बॉलिवूड’ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये बजरंग दलाचे नेते मनोज सोनी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “तो हिंदू मुलींशी लग्न करतो आणि तैमूर, अफरोज, सलमानला जन्म देतो. हा कोणता नियम आहे? तो मुस्लिम महिलांच्या प्रेमात का पडू शकत नाही? तो हिंदू समाजाला जाणीवपूर्वक आव्हान देतोय,” असा संताप सोनी यांनी व्यक्त केला.
हिंदूंना कमकुवत करण्याच्या मोठ्या कटाचा आमिर भाग असून, त्याने हे थांबवलं नाही तर त्याला धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, आमिरच्या या नव्या पत्नीबद्दल लोकांच्या मनात मोठी उत्सुकता आहे. ५ जुलै २०२६ रोजी त्याने गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्याशी तिसरी गाठ बांधली.
गौरीची कौटुंबिक पार्श्वभूमीही तितकीच रंजक आहे. तिची आई तमिळ तर वडील आयरिश आहेत. लंडनमधून फॅशन आणि स्टायलिंगचं शिक्षण घेतलेली गौरी सध्या आमिरच्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते. विशेष म्हणजे ती एका सहा वर्षांच्या मुलाची आईसुद्धा आहे. तिच्या पहिल्या पतीबद्दल मात्र अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
याआधी आमिरने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत, तर २००५ मध्ये किरण रावसोबत लग्न केलं होतं. या दोन्ही लग्नांचा शेवट घटस्फोटात झाला. आता त्याच्या या तिसऱ्या लग्नावरून सुरू झालेला हा राजकीय आणि सामाजिक वाद कुठवर जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- उर्फी जावेदचा रवी किशनच्या मुलीवर थेट हल्ला; ‘मागच्या जन्मी साप होतीस का?’, नेमकं कारण काय?
- ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरात नेमकं काय घडलं?
- प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून हटवणार? विधानसभेत शेलारांचे मोठे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












