“पैसे हवे होते म्हणून…”; नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा, सेटवर ‘त्या’ दिग्दर्शकाने दिली आई-बहिणीवरून शिवी!

नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा! पैशांसाठी कराव्या लागल्या खराब भूमिका; सेटवर दिग्दर्शकाने आई-बहिणीवरून दिली होती शिवी, वाचा सविस्तर.

Published On: 

Neena Gupta Shocking Revelation: दिग्दर्शकाने सेटवर दिली शिवी! पैशांसाठी...

बॉलिवूडच्या झगमगाटामागे एक काळोखी बाजू असते, हे आपण अनेकदा ऐकलंय. पण ‘पंचायत’ फेम एका दिग्गज अभिनेत्रीलाही सेटवर सर्वांसमोर आई-बहिणीवरून शिव्या खाव्या लागल्या होत्या, यावर तुमचा विश्वास बसेल का? होय, आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी नुकताच आपल्या स्ट्रगलबद्दल असा काही गौप्यस्फोट केलाय, ज्यामुळे सिनेवर्तुळात खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत बोलताना नीना गुप्ता यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या कठीण दिवसांवर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “माझी इच्छा नसतानाही मला अनेकदा खराब भूमिका स्वीकाराव्या लागल्या. एका सिनेमात तर मी शक्ती कपूरच्या गँगमध्ये फक्त एक एक्स्ट्रा म्हणून उभी होते. तिथे माझं काहीच काम नव्हतं.” अनेकदा शूटिंगवरून घरी आल्यावर त्या देवाला प्रार्थना करायच्या की, ‘देवा, हा सिनेमा कधीच रिलीज होऊ देऊ नकोस.’

Neena Gupta Shocking Revelation

पण सर्वात संतापजनक प्रसंग तेव्हा घडला, जेव्हा एका सेटवर दिग्दर्शकाने त्यांना अतिशय वाईट वागणूक दिली. नीना गुप्ता म्हणाल्या, “सेटवर सर्वांसमोर मला त्या दिग्दर्शकाने आई-बहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. माझी काहीही चूक नव्हती, तरीही मी तो अपमान निमूटपणे सहन केला. कारण मी तिथे अडकले होते आणि मला पैशांची गरज होती.”

जर त्यावेळी हाताशी दुसरं एखादं काम असतं, तर मी तो अपमान कधीच सहन केला नसता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज ‘बधाई हो’ आणि ‘पंचायत’ सारख्या कलाकृतींतून यशाच्या शिखरावर असलेल्या नीना गुप्तांचा हा भूतकाळ अंगावर काटा आणणारा आहे. सध्या त्या दिग्दर्शनापेक्षा अभिनयावरच लक्ष केंद्रित करत आहेत, पण त्यांच्या या खुलाशाने बॉलीवूड (Bollywood) मधील एक विदारक सत्य पुन्हा समोर आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही