🕒 1 min read
राजकारणात आणि समाजकारणात कधी कोणती समीकरणं जुळतील, हे सांगता येत नाही याचा प्रत्यय मुंबईकरांना नुकताच आला. एका बाजूला हिंदुत्ववादी विचारांचा गड मानला जाणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि दुसरीकडे बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान (Salman khan) हे कॉम्बिनेशन पचायला थोडं जड आहे ना? पण हे खरोखर घडलंय! मुंबईतील एका कार्यक्रमात चक्क सरसंघचालक मोहन भागवत आणि सलमान खान एकाच छताखाली आले होते आणि विशेष म्हणजे, खुद्द मोहन भागवतांनी (Mohan Bhagwat) भर कार्यक्रमात सलमानच्या फॅशनवर असं काही वक्तव्य केलं की, उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त (RSS 100th Year) मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये ‘नवे क्षितीज’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोहन भागवतांनी समाजातील अनुकरणाचा मुद्दा मांडला. समाजात ट्रेंड्स कसे सेट होतात, हे सांगताना त्यांनी थेट समोर बसलेल्या सलमानचं उदाहरण दिलं.
Mohan Bhagwat Comment on Salman
भागवत म्हणाले, “समाजात फॅशन आणि ट्रेंड्स हे प्रभावातून निर्माण होतात. सलमान खान काय घालतो? महाविद्यालयीन विद्यार्थी तेच परिधान करतात. तो ते का घालतोय? हे कुणालाच माहीत नसतं, पण तो घालतो म्हणून ते लोकप्रिय होतं.”
फॅशन चांगली असो वा वाईट, ती ‘महनीय’ व्यक्तींमुळे पसरते, हा धागा पकडत त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, ज्यांच्यावर समाज विश्वास ठेवतो, अशा ‘महाजन’ लोकांचं अनुकरण सामान्य जनता करत असते. भागवतांच्या या विधानावेळी सलमान खान श्रोत्यांमध्ये बसून हे सर्व ऐकत होता.
एकीकडे लॉरेन्स बिष्णोईच्या धमक्या आणि दुसरीकडे सलमानची आरएसएसच्या मंचावर उपस्थिती, यामुळे सध्या Bollywood News मध्ये आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सलमानच्या या सरप्राइज व्हिजिटचा नेमका अर्थ काय, याचे आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिग बॉसच्या घरात ‘नागिन’ अवतारात राखी सावंतची एन्ट्री; तन्वी कोलतेची घेतली शाळा
- ‘बिग बॉस’च्या घरात तलवारीने मारण्याची धमकी; दिव्या शिंदेची घरातून थेट हकालपट्टी; नेमकं काय घडलं?
- सोन्या चांदीसह अन्नधान्याच्या किंमतीत वाढ का होतेय? RBI चा महागाईबाबत मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











