प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांनी मिळवलेला विजय हीच ‘रिजीम चेंज’ अर्थात सत्ताबदलाची सुरुवात असल्याचा मोठा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताज्या वक्तव्यांवरही राऊतांनी सविस्तर भाष्य करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
सरसंघचालक मोहन भागवत आता परखडपणे बोलू लागले असून त्यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बोलावणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे राऊत म्हणाले. धनखड यांना बोलावून संघाने आपण मोदी-शहांचे गुलाम नसून आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे. भागवतांच्या या कृतीचे स्वागत करतानाच, त्यांनी असा परखडपणा कायम ठेवल्यास देशाचा स्वाभिमान जागा राहील आणि निश्चितच ‘रिजीम चेंज’ होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
सत्ताबदलाने परिस्थिती बदलत नाही, या सरसंघचालकांच्या विधानावर राऊतांनी पलटवार केला. मनमोहन सिंग यांचे सरकार बदलून मोदी-शहांना आणले गेले, तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याचे भागवतांनी एका अर्थाने मान्य केले आहे. त्यांच्या दृष्टीने देशाचे शत्रू ज्ञानेश कुमार आहेत, मात्र ज्ञानेश कुमार यांनीच मोदी आणि शहांना बनवल्याचे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, शिंदे म्हणजे राम मनोहर लोहिया नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही केवळ उद्धव ठाकरेंचीच असून शिंदे गट हे अमित शहांचे दुकान आहे, जे लवकरच बंद पडेल. आज शिवतीर्थावर मूळ शिवसेनेचा मेळावा होत असून उद्धव ठाकरे तेथूनच सत्ताबदलाचा एल्गार पुकारतील. रस्त्यावर उतरणाऱ्या कोणत्याही पक्षाचा हेतू परिवर्तन हाच असतो; सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवरून राऊतांनी सरकारला धारेवर धरले. सर्वसामान्यांवर गोळ्या चालवल्या तरी चालतात, मात्र बॉलिवूडला आणि भाजपच्या प्रचारकांना संरक्षण दिले जात आहे. बिल्डरांना पोसले जात असून मुंबई गुंडांच्या ताब्यात गेली आहे. हे सर्वजण भाजपचे नम्र सेवक असल्याचा आरोप राऊत यांनी केला. लॉरेन्स बिष्णोईला अमित शहांचे पूर्ण पाठबळ असल्याचे संपूर्ण जग बोलत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, ‘देश सुरक्षित हातात आहे’ असे सांगणाऱ्या टायगरच्या वडिलांनी आता तसे पुन्हा बोलून दाखवावे. शिंदे टायगरच्या घरी जातात, मग ते प्रदीप पूर्णेकर यांच्या घरी का गेले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, अतिमहत्त्वाकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देत असून आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, असे विधान मोहन भागवत यांनी विजयादशमी सोहळ्यात केले होते, ज्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महायुतीत आपल्याला गृहीत धरलं जातंय, अजितदादांच्या उल्लेखासह मंत्री मकरंद पाटलांनी व्यक्त केली खदखद
- गोकुळ निवडणूक निकाल २०२६: महायुती अन् हसन मुश्रीफांचे गणित कुठे चुकले? सतेज पाटलांनी सांगितले पराभवाचे कारण
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: ‘मुलाने मोठा गुन्हा केला’, आरोपी रेहानच्या वडिलांचा मोठा खुलासा
Quick Answers
गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांनी मिळवलेला विजय हीच 'रिजीम चेंज' अर्थात सत्ताबदलाची सुरुवात असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना बोलावून संघाने आपण मोदी-शहांचे गुलाम नसून आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याचे दाखवून दिले आहे, असे संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही केवळ उद्धव ठाकरेंचीच असून शिंदे गट हे अमित शहांचे दुकान आहे, जे लवकरच बंद पडेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
लॉरेन्स बिष्णोईला अमित शहांचे पूर्ण पाठबळ असल्याचे संपूर्ण जग बोलत असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






