गोकुळ निवडणूक निकाल २०२६: महायुती अन् हसन मुश्रीफांचे गणित कुठे चुकले? सतेज पाटलांनी सांगितले पराभवाचे कारण

गोकुळ निवडणुकीत महायुतीचा पराभव केल्यानंतर सतेज पाटील यांनी विरोधकांच्या ‘शपथेच्या राजकारणावर’ आणि मुंबईतून चालणाऱ्या हस्तक्षेपावर जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

कोल्हापूर, 20 ऑक्टोबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ असा पराभव करत सतेज पाटील यांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालानंतर ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी महायुती आणि हसन मुश्रीफ यांचे गणित नेमके कुठे चुकले, यावर सविस्तर भाष्य केले. बहुमत आणि संख्याबळ असतानाही विरोधकांनी देवाची भीती घालून शपथेचे राजकारण केल्यानेच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना चोख उत्तर दिल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरच्या मातीतच लढण्याची ऊर्जा असल्याचे सांगत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “पाच वर्षे एकमेकांशी भांडून एकत्र का आलात आणि शपथा कोणासाठी घेता, असे अनेक प्रश्न मतदारांना पडले होते. शपथ पाळली नाही तर ब्रेनस्ट्रोक होईल, या पातळीवर राजकारण जाणे कोल्हापूरसाठी भूषणावह नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शपथेपेक्षा लोकांचे आयुष्य आणि अर्थकारण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगताना पाटील म्हणाले की, गेल्या वर्ष-दीड वर्षात महायुतीच्या नेत्यांनी बॅनरची चर्चा, उमेदवारांची निवड, जागावाटप आणि अगदी चेअरमनही मुंबईतच ठरतील, असे वारंवार सांगितले होते. आमचा चेअरमन मुख्यमंत्री ठरवतील, असे खुद्द हसन मुश्रीफ म्हणाले होते. मात्र, कोल्हापूरकरांना हे नियंत्रण अजिबात पटले नाही आणि त्याचा मोठा फटका महायुतीला बसला.

निवडणूक चिन्ह मिळवण्यापासूनच आपल्याला त्रास झाला असून मतदानातही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, सुदैवाने प्रशासनातील पारदर्शकतेमुळे यश मिळाले. हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असलेला आहे. दूध उत्पादकांच्या हिताचा स्पष्ट अजेंडा घेऊन आपण लोकांसमोर गेलो, असे ते म्हणाले. “मी आणि मुश्रीफ २५ वर्षे सहकार आणि राजकारणात काम करत आहोत. आम्ही एकत्र असतानाचे आणि वेगळे असतानाचे अंदाज वेगवेगळे असतात. यावेळी गणित चुकणार आहे, हे मुश्रीफांना माहीत होते, पण ते काही करू शकत नव्हते,” असा दावाही त्यांनी केला.

दुसरीकडे, गोकुळच्या या निकालावर उदय सामंत यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘जेव्हा सत्तेचा अहंकार निर्माण होतो, तेव्हा गोकुळ होतं’, असा टोला सामंत यांनी जयकुमार गोरे यांना लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलचा १३-१२ असा पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही