ठाणे, 20 ऑक्टोबर: ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरच महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्या चालकाने गुंडगिरी करत ‘एबीपी माझा’चे कॅमेरामन विनय राजभर यांना जबर मारहाण केली आहे. पार्किंगच्या वादातून झालेल्या या मारहाणीत राजभर यांना मोठी दुखापत झाली असून, या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
महापालिकेच्या आवारात एबीपी माझाची गाडी उभी असताना महापौरांचा चालक सुनील खरपडे तिथे आला आणि त्याने थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले कॅमेरामन विनय राजभर आणि त्यांच्या गाडीच्या चालकाने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले. यावर संतापलेल्या खरपडे याने मुजोरी करत राजभर यांची थेट कॉलर पकडली आणि त्यांना बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. पत्रकारांवर होणारी अशा प्रकारची मारहाण कोणीही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ‘ठाणे दैनिक पत्रकार संघा’च्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
या संतापजनक प्रकारावर महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी ‘एबीपी माझा’शी फोनवरून संवाद साधला. “मला आत्ताच हा प्रकार समजला असून व्हिडीओवरून मी प्रशासनाला तातडीने योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे त्या म्हणाल्या. घटना घडली तेव्हा आपण तिथे उपस्थित नव्हतो, असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, “शब्दांची बाचाबाची झाली असती तर एकवेळ ठीक होतं, पण एखाद्याला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मग तो माझा चालक का असेना, मी अशा कृत्यांना कधीच पाठीशी घालणार नाही आणि योग्य ती कारवाई करेन.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं’; गोकुळ जिंकताच विश्वजीत कदमांचा नवा डायलॉग
- गोकुळच्या निकालानंतर सतेज पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देवाची भीती घालून शपथा…’
- टायगर श्रॉफवरील गोळीबाराने राम गोपाल वर्मा भडकले; म्हणाले, ‘केवळ अहंकार जपण्यासाठी…’
Quick Answers
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटवर पार्किंगच्या वादातून 'एबीपी माझा'चे कॅमेरामन विनय राजभर यांना जबर मारहाण करण्यात आली.
ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर यांचा चालक सुनील खरपडे याच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी प्रशासनाला तातडीने योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच एखाद्याला मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असून आपल्या चालकाच्या अशा कृत्याला पाठीशी घालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.





