टायगर श्रॉफवरील गोळीबाराने राम गोपाल वर्मा भडकले; म्हणाले, ‘केवळ अहंकार जपण्यासाठी…’

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा संतापले असून केवळ अहंकार जपण्यासाठी हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

Police investigating Tiger Shroff firing case in Mumbai

मुंबई, 20 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, केवळ रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हा जीवघेणा प्रयत्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटनास्थळाचे काही थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये अवघ्या काही सेकंदांत ५ राऊंड फायर करण्यात आल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.

गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी (१९ ऑक्टोबर २०२६) राम गोपाल वर्मा यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “टायगर श्रॉफसोबत जे घडले, तसा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. खंडणी, सुपारी देऊन केलेली हत्या किंवा आपापसातील तडजोडीतून होणाऱ्या हत्यांऐवजी, पहिल्यांदाच असं वाटतंय की आता ते केवळ आपला रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हत्या करू इच्छित आहेत.”

या घटनेवर ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही ‘एक्स’वर पोस्ट करत चिंता व्यक्त केली. “हे काय चाललंय? काल सर्वांचा लाडका आणि जॅकी श्रॉफ यांचा अत्यंत प्रतिभावान मुलगा टायगर श्रॉफ याला टार्गेट करण्यात आलं, त्याला धमक्या देण्यात आल्या आणि त्याच्यावर गोळीबार झाला,” असे ते म्हणाले. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला असला तरी त्याचा निष्पाप चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गंभीर प्रकरणाबाबत अत्यंत चिंतित असल्याचे दिसत असल्याचे म्हणत त्यांनी पोस्टच्या शेवटी ‘जय हिंद’ असे लिहिले.

दरम्यान, गायक-संगीतकार अमाल मलिक यानेही टायगरच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली आहे. अमालने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “टायगरने करिअरच्या सुरुवातीपासून प्रत्येकाचे मनोरंजन केले आहे. तो माझ्या ओळखीच्या सर्वांत दयाळू व्यक्तींपैकी एक असून त्याने कधीही जाणीवपूर्वक कुणाचे वाईट केले नाही. तरीही त्याला या सगळ्याचा सामना का करावा लागतोय, हे मला समजत नाही.” टायगरला स्वतःची काळजी घेण्याचा आणि केवळ कुटुंबासोबत राहण्याचा सल्ला देत अमालने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग करून टायगरच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली. तसेच, मुंबईत हे सर्व काय चालले आहे, असा सवालही त्याने उपस्थित केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

राम गोपाल वर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त करत, केवळ रुबाब आणि अहंकार जपण्यासाठी हा जीवघेणा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही