ठाणे, 6 ऑक्टोबर: ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या थरारक घटनेचा मुख्य सूत्रधार सुभाष उर्फ पप्या शिंदे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी पोलिसांनी या कटाबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णेकर स्वतःच्या कार्यालयात असताना पप्या शिंदे तिथेच उपस्थित होता. पूर्णेकर बेसावध असल्याची संधी साधून त्यानेच बाहेर ताटकळत असलेल्या मारेकऱ्यांना इशारा केला. हा इशारा मिळताच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून पूर्णेकरांवर ६ ते ७ गोळ्या झाडल्या. त्यानंतरही मृत्यूची खात्री करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले.
या गुन्ह्यातून वाचण्यासाठी पप्याने मोठा बनाव रचला होता. तो पूर्णेकरांना रुग्णालयात घेऊन गेला आणि संशय येऊ नये म्हणून तिथे मारेकऱ्यांना शिव्याशापही दिले. आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने आईलाही सांगितले होते. मात्र, पोलिसांनी अटक करून तपास केल्यावर त्याचा खोटेपणा उघड झाला. या हत्येचा कट तब्बल महिनाभरापूर्वीच शिजला होता आणि पप्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील सीमकार्ड वापरून मारेकऱ्यांशी सुमारे १५० वेळा फोनवरून संपर्क साधल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली.
हत्येनंतर मारेकऱ्यांनी गोव्याला पळून जावे यासाठी पप्याने एका ऑल्टो कारसह तीन दुचाकींची व्यवस्था केली होती. तसेच त्याचा साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली यानेही एका दुचाकीची सोय करून दिली होती. पूर्णेकर यांची हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे टल्लीकडे असल्याचे पप्या सांगत असला तरी, या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार कोण, याचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रेमानंद महाराजांच्या नावाने विराट कोहलीला ५ कोटींची ऑफर? फलाहरी महाराजांचे खळबळजनक आरोप
- पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा फेरबदल; सलमान आगाला डच्चू, नवा टी-२० कर्णधार जाहीर
- राम शिंदेंची जिल्हा बँक निवडणुकीतून माघार; ‘चोरी पकडल्यावर प्रामाणिकपणाचा आव’, रोहित पवारांची टीका
Quick Answers
पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुभाष उर्फ पप्या शिंदे हा आहे.
पप्या शिंदेने इशारा केल्यानंतर मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून पूर्णेकरांवर ६ ते ७ गोळ्या झाडल्या आणि मृत्यूची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले.
पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, पप्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील सिमकार्ड वापरून मारेकऱ्यांशी सुमारे १५० वेळा फोनवरून संपर्क साधला होता.
मारेकऱ्यांनी गोव्याला पळून जावे यासाठी पप्याने एका ऑल्टो कारसह तीन दुचाकींची व्यवस्था केली होती, तर त्याचा साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली यानेही एका दुचाकीची सोय केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









