Share

पाकिस्तान क्रिकेट संघात मोठा फेरबदल; सलमान आगाला डच्चू, नवा टी-२० कर्णधार जाहीर

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने टी-२० संघाचा कर्णधार बदलला आहे. सलमान अली आगाला हटवून साहिबजादा फरहानकडे श्रीलंका मालिकेसाठी नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

Published On: 

T20 World Cup 2026: पाकिस्तानची 'नापाक' चाल? ICC कडक कारवाईच्या तयारीत

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी श्रीलंका मालिकेसाठी टी-२० संघाचा नवा कर्णधार जाहीर केला असून, साहिबजादा फरहानकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निर्णयामुळे सलमान अली आगाला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याला केवळ कर्णधारपदावरूनच काढले नाही, तर १५ सदस्यीय टी-२० संघातूनही डच्चू देण्यात आला आहे. मात्र, सलमानला एकदिवसीय (वनडे) संघात स्थान कायम ठेवण्यात यश आले आहे.

श्रीलंका मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या या संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. रजाउल्लाह याला पहिल्यांदाच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात बोलावणे आले आहे. तसेच, हसन नवाज आणि नसीम शाह यांनी टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून, फखर जमान, सॅम अयुब आणि शादाब खान हेदेखील या संघाचा भाग आहेत.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी येथे खेळवले जातील. पहिला सामना ९ ऑक्टोबरला, दुसरा ११ ऑक्टोबरला आणि तिसरा सामना १३ ऑक्टोबरला रंगणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

श्रीलंका मालिकेसाठी पाकिस्तानच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी साहिबजादा फरहानकडे सोपवण्यात आली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही