प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी २०२६-२७ च्या रणजी ट्रॉफी हंगामातील पहिल्याच सामन्यासाठी मुंबईने संघाची घोषणा केली असून, यातून सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वगळण्यात आले आहे. चंडीगढविरुद्ध ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.
सूर्यकुमार यादवने आपण रणजी ट्रॉफीच्या या हंगामासाठी उपलब्ध असल्याचे मुंबई क्रिकेट आणि निवड समितीला आधीच कळवले होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाचे नेतृत्व सिद्धेश लाड करणार असून, आयुष म्हात्रेला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मार्च महिन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने ऐतिहासिक टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. लागोपाठ दुसरा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया जगातील पहिलीच टीम ठरली होती. मात्र, या विजयानंतर सूर्यकुमारचे केवळ कर्णधारपदच गेले नाही, तर त्याला भारतीय संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली संघाने वर्ल्ड कप फायनल खेळली आणि ऐतिहासिक विजय मिळवला, पण या सामन्यानंतर तो टीम इंडियाकडून खेळताना दिसला नाही. वर्ल्ड कप विजयानंतर त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला वगळण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
चंडीगढविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईचा संघ: सिद्धेश लाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे (उपकर्णधार), दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सरफराज खान, सुवेद पारकर, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियान, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसुजा आणि ओमकार तरमळे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; हरदीपसिंग पुरींसह दोन मंत्र्यांची गच्छंती, श्रीकांत शिंदेंना संधी?
- शरद लाड यांचा अर्ज ‘डमी’, भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा रवींद्र चव्हाणांचा दावा
- भाव गडगडल्याने शेतकऱ्याने तीन एकर उभ्या कोबीवर फिरवला रोटावेटर
Quick Answers
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाचे नेतृत्व सिद्धेश लाड करणार असून, आयुष म्हात्रेला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हा सामना चंडीगढविरुद्ध ११ ते १५ ऑक्टोबरदरम्यान खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
सूर्यकुमार यादवने आपण रणजी ट्रॉफीच्या या हंगामासाठी उपलब्ध असल्याचे मुंबई क्रिकेट आणि निवड समितीला आधीच कळवले होते, असे सांगण्यात येत आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









