Share

‘बिग बॉस’च्या घरात तलवारीने मारण्याची धमकी; दिव्या शिंदेची घरातून थेट हकालपट्टी; नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या घरात दिव्या शिंदेने सहस्पर्धकांना तलवार चालवण्याची धमकी दिली. या हिंसक विधानानंतर तिची शोमधून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6: 'तलवार चालवणार'; दिव्या शिंदेची थेट हकालपट्टी!

बिग बॉसच्या घरात भांडणं, आरडाओरडा आणि राजकारण नवीन नाही, पण खेळाच्या नादात कोणी थेट ‘तलवार चालवण्याची’ भाषा केली तर? ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून, त्यामुळे एका स्पर्धकाला थेट घराचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शोमधील स्पर्धक दिव्या शिंदे हिला एलिमिनेशन राऊंडची वाट न बघता थेट बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. तिच्या एका विधानाने घरात चांगलंच रान पेटलं होतं.

सध्या ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकताच घरात एक ‘अपात्र स्पर्धक’ ठरवण्याचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये स्पर्धकांना अपात्र वाटणाऱ्या सदस्याच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारायची होती. यावेळी तन्वीने दिव्या शिंदेचं नाव घेत तिला अपात्र ठरवलं. यामुळे दिव्याचा पारा चढला आणि रागाच्या भरात तिने थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde

दिव्या शिंदेने नॅशनल टेलिव्हिजनवर बोलताना अत्यंत गंभीर विधान केलं. ती म्हणाली, “माझ्या हातात बिग बॉसच्या घराबाहेर कायम तलवार असते. ती सध्या घरी असली तरी, त्याचा अर्थ असा नाही की मी बाहेर गेल्यावर ती चालवणार नाही. या घरात जे कुणी माझ्याबाबतीत बोलत आहेत, त्यांच्यावर ती तलवार चालवणार.” तिच्या या ‘Statement’ मुळे घरातील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

बिग बॉसच्या घरात हिंसा आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना अजिबात स्थान नाही. या प्रकारानंतर बिग बॉसने तात्काळ दखल घेत दिव्याला ‘Confession Room’ मध्ये बोलावले. तिथे दिव्याने बिग बॉसची माफी मागितली खरी, पण ज्या स्पर्धकांना तिने धमकी दिली होती, त्यांची माफी मागायला तिने स्पष्ट नकार दिला. “मी त्यांची माफी मागणार नाही,” या भूमिकेवर ती ठाम राहिली. अखेर नियमांचे उल्लंघन आणि हिंसक भाषेमुळे बिग बॉसने दिव्या शिंदेची घरातून तात्काळ हकालपट्टी (Expulsion) केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही