🕒 1 min read
सोशल मीडियाच्या (Social Media) जमान्यात ‘प्रेम’ म्हणजे नक्की काय? हा प्रश्न सध्याच्या तरुणाईला सतावतोय आणि याचंच टेन्शन आता आपल्या लाडक्या अभिनेत्रीलाही आलंय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हिने लग्नाबाबत आणि आजकालच्या नात्यांबद्दल केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. तिने मांडलेलं वास्तव वाचून अनेकांना स्वतःच्याच आयुष्याचा आरसा पाहिल्यासारखं वाटेल.
एका मुलाखतीत प्रियदर्शनीने आजच्या पिढीची द्विधा मनस्थिती अगदी रोखठोक शब्दांत मांडली. ती म्हणते, सोशल मीडियावर आपल्याला रोज १० वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. “कधी वाटतं प्रेमच सर्वकाही आहे, तर कधी वाटतं प्रेमात पडू नका, करिअर महत्त्वाचं आहे.” यामुळे नेमकं काय करावं, हेच कळत नाही आणि आपलं ब्रेन रॉटिंग (Brain Rotting) सुरू होतं. खोट्या जगात वावरताना लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेणं आता सोपं राहिलेलं नाही, असं तिचं म्हणणं आहे.
Priyadarshini Indalkar on Marriage
घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर बोट ठेवताना तिने एक धक्कादायक निरीक्षण नोंदवलं. ती म्हणाली, “सध्या जर तुम्ही वयाची तिशी ओलांडली असेल आणि अजूनही अविवाहित असाल, तर तुम्ही एक घटस्फोट चुकवलाय, असं म्हटलं जातं.” कारण पंचविशीत लग्न आणि तिशीत काडीमोड, हे प्रमाण भयानक रित्या वाढलंय.
एकीकडे ही भीती असली तरी, “मला लग्न नक्कीच करायचंय, मी अजूनही प्रेमाबाबत आशावादी आहे,” असंही तिने स्पष्ट केलंय. पण सध्यातरी ‘शिवाली’ म्हणजेच प्रियदर्शनी या परिस्थितीमुळे प्रचंड कन्फ्युज आहे, हे मात्र नक्की!
📌 महत्वाच्या बातम्या
- विदर्भाचं नशीब पालटणार? नागपुरात १५,००० कोटींचा प्रकल्प अन् सर्वात मोठी ‘ही’ योजना; ‘देवाभाऊं’ची मोठी घोषणा!
- मनोज वाजपेयीच्या सिनेमावर योगी आदित्यनाथ यांची करडी नजर; ‘त्या’ एका नावामुळे थेट FIR, लखनऊमध्ये खळबळ!
- ‘लाडकी बहीण’ योजनेला खुशाल अजितदादांचे नाव द्या, आम्हाला आनंदच; हर्षवर्धन सपकाळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











