Share

प्राजक्ता माळीने दाखवली कर्जतच्या आलिशान फार्महाऊसची झलक; किती आहे एका दिवसाचे भाडे?

प्राजक्ता माळीने कर्जतच्या निसर्गरम्य फार्महाऊसचा व्हिडिओ शेअर केला असून, त्याच्या आकर्षक लूक आणि एका दिवसाच्या भाड्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Published On: 

Prajakta Mali Farmhouse - Glimpse of beautiful Karjat property

तुम्हाला शहराच्या धावपळीपासून दूर एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्या घालवायला आवडेल का? त्यातही जर ते ठिकाण तुमच्या लाडक्या अभिनेत्रीचं असेल तर?

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि लाडकी सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नुकतीच तिच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसची (Karjat Farmhouse) झलक चाहत्यांना दाखवली आहे.

Prajakta Mali Farmhouse

पावसाळ्याची चाहूल लागताच हिरवाईने नटलेल्या या फार्महाऊसचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, सध्या तो चांगलाच व्हायरल होत आहे.

प्राजक्ताच्या या फार्महाऊसभोवतीचे सौंदर्य पावसाळ्यात आणखीच खुलून दिसतंय. हिरव्यागार डोंगररांगा आणि पावसाच्या रिमझिम सरींमुळे हा परिसर अतिशय विलोभनीय वाटतो.

शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या आलिशान फार्महाऊसमध्ये एकाच वेळी तब्बल १५ ते २० जण आरामात राहू शकतात. मोठा प्रशस्त हॉल, आकर्षक इंटिरिअर आणि अत्याधुनिक सुविधा इथे उपलब्ध आहेत.

सध्या सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती या जागेच्या भाड्याची! एका अंदाजानुसार, शनिवार आणि रविवारी या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं जवळपास ३० हजार रुपये आहे. तर दुसरीकडे, सोमवार ते शुक्रवार या वीक डेजमध्ये हेच भाडं १७ ते २० हजार रुपयांच्या घरात असतं. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही