🕒 1 min read
विदर्भाच्या मागासलेपणावर आणि औद्योगिक विकासावर (Industrial Development) नेहमीच चर्चा झडतात. पण आता हे चित्र बदलणार आहे का? कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विदर्भासाठी अशा काही घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे तरुणांच्या आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर फडणवीसांनी विदर्भासाठी गुंतवणुकीचं मोठं पॅकेजच उघडलं आहे.
नागपुरात आयोजित ‘अॅडव्हांटेज विदर्भ २०२६’ (Advantage Vidarbha 2026) महोत्सवात बोलताना फडणवीसांनी ही मोठी ‘गुड न्यूज’ दिली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नागपुरात तब्बल १५,००० कोटी रुपयांचा भव्य ऑटोमोबाईल प्रकल्प उभारणार आहे. विशेष म्हणजे, याचा सप्लाय युनिट संभाजीनगरमध्ये असणार आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पुणे ऑटोमोबाईलमध्ये लीडर होतंच, आता नागपूर आणि संभाजीनगरही या रेसमध्ये असतील.” २०२८ पासून या प्लांटमधून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
Devendra Fadnavis Mahindra Plant
उद्योगांसोबतच शेतकऱ्यांसाठीही ‘देवाभाऊंनी’ मोठा प्लॅन मांडलाय. महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प (River Linking Project) विदर्भात आकाराला जाणार आहे. भंडारामधील वैनगंगा ते बुलढाण्यातील नळगंगा अशी ५०० किलोमीटरची चक्क कृत्रिम नदी तयार केली जाणार आहे. यामुळे पश्चिम विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात पाणी पोहोचेल आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.
केवळ नागपूरच नाही, तर अमरावतीत आशियातील सर्वात मोठं एव्हिएशन स्कूल (Aviation School) आणि गडचिरोलीत ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प उभा राहणार आहे. “आम्ही मुंबई-ठाण्यापुरतं मर्यादित न राहता आता रायगड, संभाजीनगर आणि विदर्भ असे नवे ‘इंडस्ट्रियल मॅग्नेट’ तयार करत आहोत,” असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे आता विदर्भात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज वाजपेयीच्या सिनेमावर योगी आदित्यनाथ यांची करडी नजर; ‘त्या’ एका नावामुळे थेट FIR, लखनऊमध्ये खळबळ!
- ‘लाडकी बहीण’ योजनेला खुशाल अजितदादांचे नाव द्या, आम्हाला आनंदच; हर्षवर्धन सपकाळ
- राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; ९ कोटींच्या ‘त्या’ प्रकरणामुळे कोर्टाने चांगलेच फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











