Share

मनोज वाजपेयीच्या सिनेमावर योगी आदित्यनाथ यांची करडी नजर; ‘त्या’ एका नावामुळे थेट FIR, लखनऊमध्ये खळबळ!

मनोज वाजपेयीच्या ‘घुसखोर पंडित’ चित्रपटाविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Published On: 

Manoj Bajpayee Film FIR: 'घुसखोर पंडित' वादात, योगींचे कडक आदेश!

एका नावात काय असतं? असं शेक्सपिअर म्हणून गेला असला तरी, सध्या मात्र एका नावामुळेच मोठं महाभारत घडलंय. आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखला जाणारा मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या एका वेगळ्याच वादात अडकलाय. त्याच्या आगामी ‘घुसखोर पंडित’ (Ghuskhore Pandit) या वेब फिल्मवरून उत्तर प्रदेशात वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्यांच्या आदेशानंतर थेट एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

नेटफ्लिक्सवर (Netflix) येऊ घातलेल्या या चित्रपटाच्या शीर्षकावरून ब्राह्मण समाज आणि विविध संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. ‘पंडित’ या शब्दाला ‘घुसखोर’ विशेषण लावल्याने एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. प्रकरण चिघळू नये म्हणून लखनऊ पोलीस आयुक्तालयाने तातडीने पावलं उचलली आहेत. हजरतगंज पोलीस ठाण्यात चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पूर्ण टीमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये स्पष्ट म्हटलंय की, “समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

Manoj Bajpayee Film FIR

एकीकडे विरोधाची धार वाढत असतानाच, चित्रपटाचे निर्माते नीरज पांडे यांनी मात्र सारवासारव केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “हा चित्रपट एका पोलिसावर आधारित काल्पनिक नाटक आहे. यात कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाला टार्गेट केलेलं नाही.”

असं असलं तरी, उत्तर प्रदेश पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ‘नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स’ इव्हेंटमध्ये या सिनेमाचा टीझर आला आणि तेव्हापासूनच वादाला ठिणगी पडली होती. आता थेट मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्याने ‘फॅमिली मॅन’ स्टारच्या अडचणीत नक्कीच वाढ झाली आहे, हे मात्र नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही