Share

रितेश देशमुख भडकला! सलमान अन् संजय दत्तच्या प्रश्नावर पत्रकाराला भर कार्यक्रमात सुनावलं

नेटफ्लिक्सच्या ‘लॉक अप’ शोच्या लाँचिंग दरम्यान सलमान खान आणि संजय दत्तच्या तुरुंगवासावरून विचारलेल्या प्रश्नावर रितेश देशमुखने पत्रकाराला सडेतोड उत्तर देत सुनावलं.

Published On: 

Riteish Deshmukh Angry - Actor Riteish Deshmukh at Lock Upp Season 2 launch event on Netflix.

एखादा पत्रकार भलताच प्रश्न विचारतो आणि भर कार्यक्रमात सेलिब्रिटीचा पारा चढतो, असं सहसा घडत नाही. पण, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करून चर्चेत आलेल्या रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) बाबतीत सध्या नेमकं हेच घडलंय.

येत्या २७ जूनला नेटफ्लिक्सवर ‘लॉक अप: सच की सजा’ (Lock Upp Season 2) या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन येतोय. या शोच्या ग्रँड लाँचिंगसाठी रितेश आणि फराह खान एकत्र आले होते. सगळं काही छान सुरू असताना एका प्रश्नामुळे अचानक खळबळ उडाली आणि रितेशचा संताप पाहायला मिळाला.

Riteish Deshmukh Angry

कार्यक्रमात एका पत्रकाराने थेट सलमान खान आणि संजय दत्त यांच्या ‘लॉकअप’ (तुरुंगवास) च्या अनुभवाचा संदर्भ दिला. “तुम्ही या दोघांना तुमच्या शोमध्ये आणणार का आणि त्यांना काय शिक्षा द्याल?” असा खोचक प्रश्न पत्रकाराने विचारला. हा प्रश्न ऐकताच रितेश देशमुख चांगलाच भडकला.

रितेशने अत्यंत स्पष्ट शब्दांत सुनावत म्हटलं, “सर्वात आधी मला वाटत नाही की तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन मी त्याला कोणतीही प्रतिष्ठा द्यायला हवी. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये.”

पत्रकाराने पुन्हा तोच विषय छेडण्याचा प्रयत्न केला. त्यावर रितेशने ठामपणे सांगितलं की तो केवळ या शोचा होस्ट आहे. स्पर्धकांची निवड करण्याशी त्याचा काहीही संबंध नाही. तो फक्त शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांशी संवाद साधणार आहे.

यावेळी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी वातावरणातला तणाव हलका करण्याचा प्रयत्न केला. जर कधी तुरुंगात जावं लागलं, तर फराह आणि रितेशसारखे मनोरंजक जेलर कुठेच मिळणार नाहीत, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

नेटफ्लिक्स आणि बालाजी टेलिफिल्म्सचा हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात १४ सेलिब्रिटी ‘कैदी’ म्हणून तुरुंगासारख्या सेटवर राहतील. रितेश आणि फराह त्यांच्यावर वचक ठेवून असणार आहेत. आता या शोमध्ये कोणकोणते चेहरे दिसणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही