Share

“त्यांना ताकदवान नेते नकोत, गुलाम हवेत”; शिंदेंच्या गटात जाताच संजय दिना पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात गुलाम हवेत, ताकदवान नेते नकोत, असा घणाघात त्यांनी केला.

Published On: 

Sanjay Dina Patil leaves Uddhav Thackeray and joins Eknath Shinde faction

मुंबई – उद्धव ठाकरेंनी स्वतः बोलावून घेतलेले नेतेच आता त्यांना सोडून का जात आहेत? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

आज संजय दिना पाटील यांच्यासह संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. या पक्षप्रवेशानंतर संजय दिना पाटील यांनी आपली खदखद व्यक्त करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Sanjay Dina Patil: ‘त्या’ एका व्यक्तीमुळे सोडली ठाकरेंची साथ!

मी आमदारकी किंवा खासदारकीसाठी ठाकरेंकडे गेलो नव्हतो, तर मला स्वतः त्यांनीच बोलावलं होतं, असा थेट दावा पाटील यांनी केला. २०१४ मध्ये प्रताप सरनाईक माझ्यासाठी एबी फॉर्म घेऊन आले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. मूळात त्या पक्षात मी फक्त माझ्या कार्यकर्त्यांसाठी गेलो होतो, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, पक्षात ताकदवान नेते नकोत, तर केवळ गुलाम हवे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एका विभागप्रमुखाने स्टेजवर बसून आपल्या कुटुंबाला शिव्या दिल्या. त्यावेळी जर उद्धव ठाकरेंनी त्या नेत्याला माफी मागायला लावली असती, तर आज ही वेळच आली नसती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

ठाकरे काल मतदारसंघात आले, पण ते जर आधीच आले असते तर परिस्थिती वेगळी असती, असे पाटील म्हणाले. खासदार असूनही फंड वापरता येत नव्हता आणि शाखाप्रमुखांना त्यांना भेटण्याची बंदी होती. तसेच आपल्याला कार्यक्रमांनाही बोलावले जात नव्हते, त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती.

पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. राऊतांनी नेहमीच सन्मान दिला असून २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी मदत केल्याचे पाटील म्हणाले. आता पाटील यांच्या घरातच त्यांची मुलगी ठाकरेंसोबत, पुतण्या भाजपमध्ये, तर सूनबाई भाजपच्या नगरसेविका आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही