Share

उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव किती दिवस टिकणार? संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट

आमदार भास्कर जाधव यांच्या भूमिकेवर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते लवकरच ठाकरेंची साथ सोडतील, असे संकेत दिले आहेत.

Published On: 

Bhaskar Jadhav Shivsena leader Sanjay Shirsat talking to media in Sambhajinagar

मुंबई – ठाकरेंच्या गोटातून एकामागून एक खासदार बाहेर पडत असताना आता निष्ठावंत मानले जाणारे आमदारही साथ सोडणार का? मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेनेच्या उबाठा गटातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्यानंतर आधीच राजकीय वातावरण गरम आहे. अशातच आमदार भास्कर जाधव यांचा झालेला अपमान सबंध महाराष्ट्राने पाहिला असून ते किती दिवस ठाकरेंसोबत राहतील हे सांगता येत नाही, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

Bhaskar Jadhav Leave UBT Shivsena Soon

मुंबईत उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्यामुळे आधीच चर्चांना उधाण आलं होतं. जरी या आमदारांनी अनुपस्थितीची कारणे दिली असली, तरी संशयाची पाल चुकचुकलीच. त्यातच पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ ट्विट करत खोचक टोला लगावला. याच मुद्द्यावरून आता महायुतीने ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे.

संभाजीनगर-जालना विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी हा दावा केला. भास्कर जाधव हे स्वाभिमानी नेते असून ते अशा प्रकारचा अपमान जास्त काळ सहन करणार नाहीत, त्यामुळेच ते लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत शिरसाट यांनी दिले. जनतेच्या मनात असलेले काम ओमराजे निंबाळकर यांनी केले असल्याचे सांगत आता उरले-सुरले खासदारही सोडून जात असल्याचा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे, शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राऊत हे नेहमीच बालिश आणि रटाळ विधाने करत असतात, अशी टीका त्यांनी केली. २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता भोगूनही त्यांनी काय केले, असा थेट सवाल त्यांनी विचारला. पक्षाला बुडवण्याचे काम सध्या एकच माणूस चोखपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतीही एकजूट उरलेली नसून आगामी विधिमंडळ अधिवेशनात याचे थेट पडसाद उमटतील, असा दावाही त्यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही