🕒 1 min read
मुंबई : ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत आहे.
पक्षप्रवेशानंतर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी मोठी घोषणा केली. “या भागातील प्रकल्प, समस्या आणि प्रश्न प्रामाणिकपणे सोडवले जातील. विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. “आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून एकत्र काम करणार आहोत. कोणताही नेता-मालक नसून सर्व सहकारी म्हणून पुढे जाऊ,” असेही त्यांनी नमूद केले.
तसेच, खासदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारशी संबंधित मुद्द्यांवरही समन्वय साधून मार्ग काढला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशात ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यासह सहा खासदारांचा समावेश आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Breaking News : ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांचा शिंदे गटात प्रवेश
- नवी मुंबईतील काळा धंदा उघडकीस; नगरसेवकासह चौघांवर गंभीर आरोप
- ऑपरेशन टायगर यशस्वी? 6 खासदार शिंदेंच्या भेटीला, सातव्या नावाची चर्चा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












