शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत (shivsena symbol) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार असून, दुपारी २ वाजता कामकाज सुरू होईल. मागील सुनावणीदरम्यान कपिल सिबल (Kapil Sibal) यांनी पक्षाच्या चिन्हाचा मुद्दा आणि सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा यांवर विशेष भर देत जोरदार युक्तिवाद केला होता. या युक्तिवादादरम्यान जनता दल आणि समाजवादी पक्षाच्या उदाहरणांचाही संदर्भ देण्यात आला होता.
सिबल यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयांबाबतही युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या बाजूने काही निर्णय घेऊन निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांची सीमा ओलांडली असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यावरून आयोगावर कडक टीका केली. आजच्या सुनावणीत कपिल सिबल ठाकरे गटाच्या वतीने आपला युक्तिवाद पुढे चालू ठेवतील.
Shivsena symbol case hearing
सर्वोच्च न्यायालयात कपिल सिबल आज पुन्हा युक्तिवाद करतील. पक्षाच्या चिन्हाबाबत ठाकरे गटाने केलेल्या दाव्यांचे खंडन करण्याचे मोठे आव्हान शिंदे गटासमोर आहे. कारण सिबल यांनी यापूर्वीच संघटनात्मक नियमांवर प्रकाश टाकला असून संघटनात्मक पाठिंबा कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट केले आहे.
त्यांनी पक्षाच्या घटनेत कधी सुधारणा करण्यात आल्या याचा तपशीलही दिला आणि पक्षाचे सर्व अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडेच निहित असल्याचे प्रतिपादन केले.
राजकीय पक्षात फूट पडल्यास पक्षाची मालकी आणि चिन्ह कोणाकडे राहील, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो. शिवसेनेच्या विधिमंडळ गटातील फुटीलाच संपूर्ण राजकीय पक्षातील फूट मानून निवडणूक आयोगाने चूक केली, असा युक्तिवाद सिबल यांनी यापूर्वी न्यायालयात केला आहे. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडतील.
आजही कपिल सिबल जोरदार युक्तिवाद करतील अशी अपेक्षा आहे. मागील सुनावणीदरम्यान, त्यांनी आपल्याकडील काही कागदपत्रे स्वीकारण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती आणि निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या पावत्याही सादर केल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेली फूट ही केवळ विधिमंडळ गटापुरती मर्यादित होती आणि ती संपूर्ण राजकीय पक्षातील फूट नव्हती, असा युक्तिवादही त्यांनी केला होता. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Weather Update: मान्सूनचा जोर मंदावला; शेतकऱ्यांची चिंता वाढली
- शिंदे गटात गेलेल्या खासदारांना धक्का? संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; 31 ऑगस्टला सुनावणी
- उदय सामंत शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत!; नवनाथ वाघमारेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











