Share

शिंदे गटात गेलेल्या खासदारांना धक्का? संजय देशमुखांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; 31 ऑगस्टला सुनावणी

शिंदे गटात गेलेले खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस बजावण्यात आली असून 31 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

Published On: 

Sanjay Deshmukh Supreme Court notice

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. या खासदारांपैकी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सहा खासदारांनी केलेल्या बंडाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दाखल केली होती. याच याचिकेच्या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. या घडामोडीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खळबळ उडाली आहे.

Sanjay Deshmukh Supreme Court notice

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाची ही नोटीस देण्यासाठी, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक घोगल मुंबईहून संजय देशमुख यांच्या चिंचोली येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.

मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह यवतमाळचे जिल्हाप्रमुख सह स्थानिक सेनेचे पदाधिकारी सध्या चिंचोली येथे हजर आहेत. या याचिकेवरील सुनावणी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. बंडखोर खासदार हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीतच सुनावणी घेतली जाईल, असे नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जून महिन्यात यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला.

बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश होता. या बंडानंतर ठाकरे गटाने या खासदारांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली. ही नोटीस बजावणे हा त्याच प्रक्रियेचा एक भाग आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही