Share

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘दोन-चार लोकांना रिटायर केल्यावर…’

रिटायरमेंटच्या चर्चेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट भूमिका घेत ‘मी काही रिटायर होत नाही’ असे ठणकावून सांगितले.

Published On: 

Pankaja Munde political statement

Pankaja Munde : मी रिटायर होणार असल्याची अफवा कोणीतरी पसरवली. मी अजिबात रिटायर होणार नाही, मी अजूनही जोमाने काम करत आहे. माझ्यामध्ये काय कमतरता आहे? मी रिटायरमेन्ट का घ्यावी? दोन चार लोकांना रिटायर केल्यावर आपण रिटायर व्हायचे, हे ठाम विधान राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले.

पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या नेमके कोणाला लक्ष्य करत आहेत, याबद्दल आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Pankaja Munde political statement

बीडमधील (Beed) एका कार्यक्रमात बोलताना आणि प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा संदर्भ देत पंकजा मुंडे यांनी आपण रिटायर होणार नसल्याचे स्पष्ट केले. “मी ४७ वर्षांची झाले आहे. माझ्यामध्ये अजूनही भरपूर ऊर्जा आहे. अजून माझ्यात दम आहे. तोपर्यंत काम करायचं. मात्र, हे काम कधीकधी अत्यंत कष्टाचे असते. लोकांची सेवा करण्यात माझ्याकडून कोणतीही कमतरता राहू नये, हीच माझी एकमेव चिंता आहे.”

“मुंडे साहेबांनी अतोनात कष्ट केले, तरीही त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ अनुभवण्याची संधी देवाने दिली नाही. जर मुंडे साहेब आणखी पाच वर्षे जगले असते, तर ते पूर्णपणे तुमच्यासाठीच जगले असते,” असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आम्हीही केवळ तुमच्यासाठीच जगतो आणि काम करतो. जरी आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरी कृपया मनाचे नाते तोडू नका. आपण सर्वांनी मिळून हे एक विशाल कुटुंब उभारले आहे. ते तोडण्यासाठी टपलेले अनेक लोक आहेत. कृपया तसे होऊ देऊ नका.”

“आपल्या भविष्यासाठी, जिल्ह्याच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बहुजन समाजासाठी हे कार्य पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. मी ही जबाबदारी तुमच्यावर सोपवते. आपला प्रेमाचा आशीर्वाद कायम असुद्या,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

फसवणूक खपवून घेतली जाणार नाही

बोगस रस्ते आणि सभागृहांची बिले उचलणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. माझ्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावात नवीन उद्योजक घडवण्याचे माझे उद्दिष्ट आहे. यासाठी ५० टक्क्यांपर्यंतचे भरीव अनुदान उपलब्ध आहे. जर तरुणांनी एखाद्या व्यवसायात १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना सरकारकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळेल.

पण इथे अशा भ्रष्टाचाराला अजिबात वाव नाही. सिग्नल तोडणे, चोरी करणे किंवा महामार्गावरील ढाब्यांवर जाऊन मद्यपान करून गाडी चालवणे, यांसारख्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी मला ही उमेदवारी मिळालेली नाही. केवळ नियमांचे पालन करणारा नेताच लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने घडवू शकतो.

तरुणांनी चुकीचा मार्ग सोडून कायदेशीर मार्गाने प्रगती साधण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. गुन्हेगारी किंवा गैरवर्तनात वेळ वाया न घालवता, त्याऐवजी सरकारी योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी उद्योजक बनावे आणि चांगले उत्पन्न मिळवावे, असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी तरुणांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही