रायगड (Raigad Guardian Minister) आणि नाशिक (Nashik Guardian Minister) जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नेमण्याबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सरकारने आज दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. यात नाशिकसाठी गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडसाठी भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘महायुती’मधील तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा आपापल्या जिल्ह्यांवर वर्चस्व राखण्याचा आणि निधीवरील नियंत्रण मिळवण्याचा आग्रह होता. यामुळेच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदांच्या नियुक्त्या काही काळ रखडल्या होत्या. मात्र, आता हा विषय निकाली निघाला आहे.
Girish Mahajan and Bharat Gogawale as Guardian Ministers
रायगडच्या पदासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चुरस होती. मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले या दोघांचीही या पदासाठी इच्छा होती. अखेरीस, ही जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली.
त्याचप्रमाणे, नाशिकच्या पदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात स्पर्धा होती, परंतु नाशिकची जबाबदारी अखेरीस गिरीश महाजन यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली.
नाशिकचे रूप पालटणार – गिरीश महाजन
“पांडुरंग पावला… मी दर्शन घेत असताना बायकोने हळूच कानात मी नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितली. आज पत्नी आणि मतदारसंघातील 15 ते 16 हजार मतदारांसह पंढरपूरच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतानाच ही बातमी कळली आणि खूप आनंद झाला. आता यंदाचा महाकुंभ न भूतो न भविष्य, असा होईल. नाशिकचा चेहरा-मोहरा बदलून जाईल.” अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
कोण आहेत भरत गोगावले?
भरत गोगावले हे महाराष्ट्र सरकारमधील रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री आहेत. ते महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी असून महाड विधानसभा मतदारसंघाचे (शिवसेना – शिंदे गट) आमदार आहेत. २००९ पासून महाडमधून सलग तीन वेळा निवडून आलेले गोगावले हे राजकीय वर्तुळात एक आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात.
गिरीश महाजन कोण आहेत?
गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील एक प्रभावशाली राजकारणी आहेत. पक्षात ते ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जातात. ते जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत.
सध्या ‘महायुती’ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या महाजन यांची अलीकडेच नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीस अचानक मोदींच्या भेटीला; दिल्लीत बंद दाराआड काय चर्चा झाली?
- ‘मुंडे साहेब भाजपच्या जाचाला कंटाळले होते’; महादेव जानकरांचा मोठा दावा
- लामगव्हाण घरफोडीत ४ संशयित पोलिसांच्या जाळ्यात; एकाकडे सापडलं ‘बनावट आधार कार्ड’; मोठा कट उघडकीस येणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











