Share

देवेंद्र फडणवीस अचानक मोदींच्या भेटीला; दिल्लीत बंद दाराआड काय चर्चा झाली?

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून, महाराष्ट्रातील विकासप्रकल्पांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

Published On: 

Devendra Fadnavis meets PM Modi

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. ही भेट दिल्लीत झाली. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. शरद पवार गटातील खासदारांनीही नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार गट एनडीए (NDA) मध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती.

दरम्यान, अलीकडच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) विरोधात बंड करून शिवसेनेत (शिंदे गट) सामील झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्रीय सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

Devendra Fadnavis meets PM Modi

शिंदे यांच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यातील विकासकामांबाबत आपण मोदींना माहिती दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये फडणवीस मोदींना पुष्पगुच्छ देताना दिसत आहेत. मोदी आणि फडणवीस यांच्या भेटीदरम्यान नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत कोणताही तपशील समोर आलेला नाही.

त्याचबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ ऑगस्टच्या रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त होते, मात्र त्यामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही