Share

योगी आदित्यनाथ यांच्या अडचणी वाढणार? ‘मच्छी पार्टी’च्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्याने थेट कोर्टात खेचले

मच्छी पार्टी’च्या दाव्यावरून काँग्रेसचे अजय राय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लखनौ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Published On: 

UP Congress president Ajay Rai files defamation case against CM Yogi Adityanath over fish feast remarks in Ayodhya

Yogi Adityanath Defamation: उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या एका ‘मच्छी पार्टी’वरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी थेट त्यांना कोर्टात खेचले आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आता लखनौ न्यायालयाने मोठी अपडेट दिली असून, अजय राय यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी २५ सप्टेंबरची तारीख दिली आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांच्या न्यायालयात १ सप्टेंबर रोजी हा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २४ ऑगस्ट रोजी रायबरेलीतील एका जाहीर सभेत अजय राय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राय यांनी अयोध्येतील हनुमानगढीचे दर्शन घेतल्यानंतर थेट एका ‘मच्छी पार्टीत’ (मासे खाण्याची मेजवानी) हजेरी लावल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यामुळेच आता या प्रकरणाने थेट न्यायालयाची पायरी चढली आहे.

Yogi Adityanath Defamation Case

‘मी शाकाहारी आहे, पुरावा द्या नाहीतर राजकारण सोडेन’

या आरोपांवरून संतापलेल्या अजय राय यांनी मुख्यमंत्र्यांचे दावे पूर्णपणे खोटे, आक्षेपार्ह आणि आपली प्रतिमा मलिन करणारे असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी अयोध्येत निषाद समाजाचा एक कार्यक्रम आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तिथे राय यांना निमंत्रित करण्यात आले होते. समाजाच्या परंपरेनुसार कार्यक्रमानंतर मच्छी पार्टी होती, पण आपण मासे खाल्ले नसल्याचे राय यांनी स्पष्ट केले आहे.

राय यांनी स्वतःला पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगत, आपण मासे खात असल्याचा एखादा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवावा, असे थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांना दिले आहे. जर असा पुरावा कोणी दिला, तर आपण थेट राजकारण सोडून देऊ, अशी मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. केवळ मी तिथे पोहोचल्याचे फोटो आणि निषाद समाजाचे लोक मासे खात असल्याचे फोटो एकत्र करून जाणीवपूर्वक हा गैरसमज पसरवला गेला, असा आरोपही त्यांनी तक्रारीत केला आहे. आता २५ तारखेला न्यायालयात राय काय जबाब नोंदवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही