Share

बिग बॉसच्या घरात ‘नागिन’ अवतारात राखी सावंतची एन्ट्री; तन्वी कोलतेची घेतली शाळा

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची ‘नागिन’ अवतारात एन्ट्री. आल्या आल्या तन्वी कोलतेची घेतली शाळा, ‘तन्वी कोळसे’ म्हणत उडवली खिल्ली. वाचा सविस्तर.

Published On: 

Rakhi Sawant Entry: बिग बॉसमध्ये 'नागिन' अवतार; तन्वीला म्हणाली, 'तुला सोलते...'

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत सगळं कसं ‘गुडी-गुडी’ चाललं होतं, असं तुम्हाला वाटत होतं का? तर आता तो विचार मनातून काढून टाका. कारण या घरात आता शांतता नाही, तर फक्त ‘दहशत’ आणि ‘एंटरटेनमेंट’ असणार आहे. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात (Bigg Boss Marathi 6) अखेर त्या ‘वादळा’ची एन्ट्री झालीच! होय, ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे.

घरातील स्पर्धकांचे गेम प्लॅन आता कोलमडणार आहेत, कारण राखीने ‘वाईल्ड कार्ड’ (Wild Card) म्हणून घरात पाऊल टाकलं आहे आणि एन्ट्री तरी साधी कशी असेल? राखीने चक्क सोनेरी रंगाचा वन-पीस आणि डोक्यावर ‘नागिन’चा मुकूट घालून घरात प्रवेश केला. तिचा हा अवतार पाहून घरातील सदस्यही काही क्षण अवाक् झाले.

Rakhi Sawant Entry In Bigg Boss Marathi 6

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राखीचा ॲटीट्यूड पाहण्यासारखा आहे. ती थेट म्हणाली, “राखी जाणार आणि गेम पूर्ण पालटणार. माझ्याशिवाय हा शो अधूरा आहे, हे जगाला माहितीये. आता घरात फक्त राखीची मर्जी चालणार.” तिने प्रेक्षकांना प्रॉमिस केलंय की, आता घरात तिचे अतरंगी कपडे आणि ‘नॉन-स्टॉप धम्माल’ बघायला मिळणार आहे.

पण खरी ‘खळबळ’ तर पुढे उडाली. घरात पाऊल टाकताच राखीने स्पर्धक तन्वी कोलतेची चांगलीच ‘शाळा’ घेतली. राखीने तन्वीला थेट ‘तन्वी कोळसे’ अशी हाक मारली आणि भर सभेत सुनावलं, “आता तुला मी चांगलंच सोलते!” हे ऐकताच घरात एकच हशा पिकला, पण तन्वीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.

आता राखीच्या येण्याने घरातील समीकरणं पूर्णपणे बदलणार, हे नक्की. ‘एंटरटेनमेंटचा ओव्हरडोस’ आता सुरू झालाय, असं म्हणायला हरकत नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही