Share

कांद्याला भाव मिळेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र

कांद्याला अवघा १२.३५ रुपये किलो भाव मिळत असल्याने संतप्त जुन्नरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.

Published On: 

Onion Farmer Ganja Cultivation Demand letter to Tehsildar by Junnar farmer

🕒 1 min read

शेतात राबूनही जर हातात काहीच पडत नसेल, तर बळीराजाने जगायचं कसं? महाराष्ट्रात सध्या कांद्याच्या भावाने (Onion Price Maharashtra) शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय.

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावातील एका शेतकऱ्याने थेट प्रशासनालाच मोठा धक्का दिलाय. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क ‘गांजा’ (Ganja Cultivation) लागवडीची परवानगी मागितली आहे.

Onion Price Maharashtra

सुनील उकिर्डे असं या संतप्त शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या या पत्रामुळे जुन्नरमध्ये (Junnar News) मोठी खळबळ उडाली आहे. शेतीचा धंदा आता आतबट्ट्याचा व्यवहार बनल्याने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

उकिर्डे यांनी २०२५-२६ च्या हंगामात तब्बल १० एकर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एकरी १ लाख २० हजार रुपयांचा मोठा खर्च आला.

दुसरीकडे, शासनाने नाफेडमार्फत कांद्याला अवघा १२.३५ रुपये प्रति किलो इतका खरेदी दर जाहीर केलाय. हा दर अजिबात परवडणारा नसल्याचं उकिर्डे यांचं म्हणणं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्प दरामुळे त्यांना एकरी ४० ते ४५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसतोय. त्यामुळेच हा तोटा भरून काढण्यासाठी आता गांजा लागवडीशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय.

सध्या बियाणे, खते, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च गगनाला भिडला आहे. त्यामुळे शेतमालाला योग्य किमान आधारभूत किंमत (MSP) मिळणं काळाची गरज बनली आहे.

पण शासनाकडून योग्य भाव मिळत नसल्याने, उकिर्डे यांनी थेट गांजा लागवडीची मागणी करून एक अभिनव आणि तितकाच धक्कादायक निषेध नोंदवला आहे. त्यांच्या या पत्रावर आता तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!