भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे; ‘त्या’ कृतीवरून राऊतांचा संताप, जय शाहांचे नाव घेत मोठा आरोप!

संजय राऊतांनी भारतीय क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली आहे. हात न मिळवण्याच्या घटनेवरून त्यांनी खेळाडूंना खडेबोल सुनावले; “लाज वाटली पाहिजे,” म्हणत केला संताप व्यक्त.

Published On: 

Sanjay Raut on Ind Vs Pak: क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे; राऊतांचा हल्लाबोल!

भारताने पाकिस्तानला धुळ चारली, पण विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी आता वेगळाच वाद का पेटलाय? मैदानातील एका घटनेवरून आता राजकारण चांगलंच तापलं असून, संजय राऊतांनी थेट भारतीय क्रिकेटपटूंनाच लक्ष्य केलंय. “खेळाडूंच्या अंगातही आता अंधभक्ती भिनलीय,” अशा शब्दांत राऊतांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) मध्ये भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी दणदणीत पराभव करत ‘Super-8’ मध्ये दिमाखात एन्ट्री मारली. पण सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणं (Handshake) टाळलं, आणि इथेच वादाची ठिणगी पडली. यावर भाष्य करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय संघावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे. त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनले आहेत.”

Sanjay Raut on Ind Vs Pak

पत्रकारांशी बोलताना राऊतांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्यावरही निशाणा साधला. “हा सामना भारत-पाकिस्तान नसून ‘जय शाह विरुद्ध पाकिस्तान’ असा आर्थिक सामना होता,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये धमक्या दिल्या जातात, असा दावा करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. संजय मांजरेकर यांनी खेळाडूंच्या या वागण्याला ‘मूर्खपणा’ म्हटलं होतं, त्यांच्या या मताशी राऊतांनी १०० टक्के सहमती दर्शवली आहे.

राऊतांनी या प्रकरणाला थेट दहशतवादाशी जोडलंय. “पाकिस्तानसोबत खेळल्याने फार तर Betting मध्ये हजारो कोटी मिळतील. पण त्यातले निम्मे पैसे पाकिस्तानात जातात आणि ते पैसे दाऊद इब्राहिमकडे जाऊन दहशतवाद वाढणार, हे मोदींना माहित नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेची (Uddhav Thackeray) भूमिका स्पष्ट आहे, जोपर्यंत काश्मीरमधील सांडलेल्या रक्ताचा बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी खेळू नका, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही