Share

काय सुंदर दिसते राव, ईशान किशनची गर्लफ्रेंड; आजोबांनी थेट नावच सांगितलं; कोण आहे ‘ही’ सुंदरी?

टी-२० विश्वचषकादरम्यान ईशान किशनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आजोबांनीच आता गर्लफ्रेंड अदिती हुंडियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं असून लवकरच सनई-चौघडे वाजण्याची शक्यता आहे.

Published On: 

Ishan Kishan Girlfriend: कोण आहे अदिती हुंडिया? आजोबांचा मोठा खुलासा

मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय, पण इकडे बाहेर वेगळीच ‘मॅच’ फिक्स झाल्याची चर्चा आहे. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हाय-व्होल्टेज सामना रंगला असतानाच, टीम इंडियाचा स्टार फलंदाज इशान किशनच्या (Ishan Kishan) खासगी आयुष्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. विशेष म्हणजे हा खुलासा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर खुद्द इशानच्या आजोबांनीच केलाय. त्यामुळे इशान लवकरच ‘बोहल्यावर’ चढणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना इशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी आपल्या नातवाच्या लग्नाबद्दल आणि गर्लफ्रेंडबद्दल स्पष्टच सांगितलं. ते म्हणाले, “इशानने घरी सांगितलं होतं की, अदितीने त्याच्या एका मुलाखतीचं खूप कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे, तुमचे आजोबा खूप हँडसम दिसतात, अशी पावतीही तिने दिली होती.” आजोबांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

Ishan Kishan Girlfriend

आजोबांनी नाव कन्फर्म केल्यानुसार, इशानच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती म्हणजे अदिती हुंडिया (Aditi Hundia). ती जयपूरची असून पेशाने मॉडेल आहे. मिस इंडिया स्पर्धेत ती रनर-अप (दुसरा क्रमांक) राहिली आहे. गेल्या काही वर्षांपासून इशान आणि अदितीच्या डेटिंगच्या अफवा होत्या, पण आता कुटुंबानेच त्यावर शिक्कामोर्तब केलंय.

पांडे यांनी स्पष्ट केलं की, “इशानच्या मोठ्या भावानेही पसंतीने लग्न केलं आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला. इशानच्या बाबतीतही तेच होईल. तो ज्या मुलीशी लग्न करेल, तिचा आम्ही आदर करू.”

सध्या इशान टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये (T20 World Cup 2026) व्यस्त आहे. नामिबियाविरुद्ध त्याने २४ चेंडूत ६० धावा कुटल्या होत्या. आता पाकिस्तानविरुद्ध तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही