Share

IND vs PAK : एकीकडे ‘नो हँडशेक’, तर दुसरीकडे रोहितने काय केलं? वसीम अक्रमला पाहताच…..

टीम इंडियाने पाकिस्तानशी हस्तांदोलन टाळले, पण रोहित शर्माने वसीम अक्रमची गळाभेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. संजय मांजरेकरांनी यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Rohit Sharma Hugs Wasim Akram: हँडशेकवरून वाद, पण रोहितची 'ती' कृती चर्चेत

“मैदानात विजय मिळवला, पण खेळभावना हरली का?” सध्या क्रिकेटविश्वात हा एकच प्रश्न चर्चिला जातोय. टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) ६१ धावांनी धूळ चारली, पण सामन्याच्या निकालापेक्षा जास्त चर्चा टीम इंडियाच्या ‘नो हँडशेक’ (No Handshake) पॉलिसीची आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका व्हिडिओची होत आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर जे घडलं, त्याने सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत.

एकीकडे भारतीय संघाने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला (ही प्रथा आशिया कप २०२५ पासून सुरू आहे), तर दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार आणि या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसला.

Rohit Sharma Hugs Wasim Akram

सामन्यापूर्वी रोहितने ट्रॉफी मैदानात आणली, तेव्हा तिथे पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) उपस्थित होता. रोहितने वसीमला पाहताच त्याला घट्ट मिठी मारली (Hugging), हसून गप्पा मारल्या. दोघांच्या या मैत्रीपूर्ण गळाभेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रोहित आणि वसीम यांच्यात एवढं सख्य असू शकतं, तर सध्याच्या भारतीय संघाला हँडशेक करायला काय हरकत आहे? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. या दुहेरी भूमिकेवरून क्रिकेट वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

या प्रकारावर समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “क्रिकेट आता खेळापेक्षा जास्त राजकीय अजेंड्याचा भाग बनत चालला आहे. पूर्वीसारखा तो भावनिक ओलावा आता राहिला नाही.” तर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी तर थेट टीम इंडियाला सुनावले आहे. “ही ‘नो हँडशेक’ पद्धत भारताला शोभत नाही. खेळभावनेने खेळा, नाहीतर खेळूच नका,” अशा कडक शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही