IND vs PAK: भारताने ‘अब्रू’ काढली; पाकिस्तानचे हाल पाहवेना म्हणून PCB प्रमुखांनी सामना संपण्याआधीच काढला पळ?

भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. या पराभवाची चाहूल लागताच PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी सामना अर्ध्यावर सोडून निघून गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Published On: 

Mohsin Naqvi Leaves Stadium: भारताचा दणका! PCB प्रमुखांनी तोंड लपवून काढला पळ?

“मैदानात हरलात तरी चालेल, पण इज्जत घालवू नका,” असं म्हणतात. पण कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानच्या नशिबात काल काही वेगळंच लिहिलं होतं. भारताने पाकिस्तानला अशा काही प्रकारे लोळवलं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांना सामना पूर्ण पाहण्याचं धाडस ही झालं नाही. सध्या सोशल मीडियावर एक विडिओ (Video) वायरल झालाय, ज्यामध्ये नक्वी आपली गाडी घेऊन गुपचूप स्टेडियमबाहेर पडताना दिसत आहेत.

सामन्यापूर्वी बहिष्कार टाकण्याच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची मैदानावर मात्र पुरती फजिती झाली. भारताने विजयासाठी दिलेल्या १७७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. सुरुवातीच्या २ षटकांतच ३ विकेट्स गेल्यानंतर पाकिस्तानी डगआउटमध्ये सन्नाटा पसरला होता.

Mohsin Naqvi Leaves Stadium

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डावाच्या १२ व्या षटकात कुलदीप यादवने जेव्हा मोहम्मद नवाजला बाद केलं, तेव्हा पाकिस्तानचा पराभव स्पष्ट दिसत होता. हा अपमान सहन न झाल्याने मोहसीन नक्वी यांनी सामना संपण्याआधीच स्टेडियममधून काढता पाय घेतला.

भारताने नाणेफेक गमावली असली तरी सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. ईशान किशनने ७७ धावांची आक्रमक खेळी करत भारताला १७६ धावांपर्यंत पोहोचवलं. उत्तरादाखल पाकिस्तानचा संघ ११५ धावांतच गुंडाळला गेला आणि भारताने ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

या लाजीरवाण्या पराभवामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. पॉइंट टेबलमध्ये ते आता चक्क अमेरिकेच्या (USA) खाली तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. अमेरिकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा सरस आहे. आता नामिबियाविरुद्धचा पुढचा सामना पाकिस्तानसाठी ‘करा किंवा मरा’ (Do or Die) असा असेल. जर तिथे गडबड झाली, तर पाकिस्तानला बॅगा भरून घरी परतावं लागेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही