IND vs PAK: विजयाचा जल्लोष बाजूला, कॅप्टन सूर्या ‘त्या’ एका गोष्टीमुळे भडकला; डोळे वटारले अन्…

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यातील तणावाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. झेल सुटल्याने सूर्याचा पारा चढल्याचे दिसून आले.

Published On: 

Suryakumar Yadav Angry: विजयानंतरही टीम इंडियात राडा? व्हिडीओ व्हायरल | ind vs nz

पाकिस्तानला हरवणं म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी दिवाळीच, पण या मोठ्या विजयानंतरही टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वकाही ठीक नाहीये का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. कोलंबोच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, पण विजयानंतर जे घडलं, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मैदानावरचा एक विडिओ (Video) सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय.

सामन्याच्या दुसऱ्या डावात १८ व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. पाकिस्तानचा फलंदाज उस्मान तारिकने फटका मारला आणि चेंडू सीमारेषेजवळ गेला. तिथे उभ्या असलेल्या कुलदीप यादवकडून (Kuldeep Yadav) तो सोपा झेल सुटला. झेल सुटताच हार्दिकचा संताप झाला, पण त्याहून जास्त भडकला तो कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). त्याने रागाने कुलदीपला काहीतरी सुनावल्याचं कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं.

Suryakumar Yadav Angry

सामना जिंकल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांचे अभिनंदन करत होते, तेव्हा कुलदीपचा चेहरा पडलेला होता. त्याने सूर्याला मिठी मारली खरी, पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी लपत नव्हती. यावेळीही सूर्या त्याला काहीतरी रागाने बोलताना दिसला आणि पुढे निघून गेला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी सूर्याच्या ‘कॅप्टन्सी ऍटीट्यूड’वर प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा वादाचा प्रसंग सोडला तर टीम इंडियाने मैदानात तोडफोड कामगिरी केली. ईशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७५ धावा कुटल्या आणि पाकिस्तानला अवघ्या ११४ धावांत गुंडाळलं. टी-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा (धावांच्या फरकाने) आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. या लाजीरवाण्या पराभवामुळे पाकिस्तान पॉइंट टेबलमध्ये थेट अमेरिकेच्याही खाली घसरलाय, त्यामुळे त्यांची सुपर-८ ची वाट अधिक बिकट झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही