Share

Ind vs Pak: ईशान किशनचं वादळ; पाकिस्तानला घाम फोडला, पण ‘त्या’ एका चुकीने शतक हुकलं

ईशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ४० चेंडूत ७७ धावा केल्यानंतर एका चुकीमुळे तो बाद झाला आणि पाकिस्तानला हायसं वाटलं.

Published On: 

Ishan Kishan Batting: ७७ धावांची आतषबाजी, पण शतक हुकलं!

जेव्हा एखादा फलंदाज समोरच्या गोलंदाजाला ‘पाणी मागायला’ लावतो, तेव्हा त्याची काय अवस्था होते हे आज पाकिस्तानने अनुभवलं. पण म्हणतात ना, ‘अति घाई संकटात नेई’, याचाच प्रत्यय आज ईशान किशनच्या बाबतीत आला. कोलंबोच्या मैदानात (Colombo) आज ईशान किशन नावाचं असं काही वादळ आलं की, पाकिस्तानचे गोलंदाज हतबल झाले होते. पण ऐन मोक्याच्या वेळी शतकाच्या उंबरठ्यावर असताना ईशानने केलेली एक छोटीशी चूक भारताला महागात पडली.

आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R. Premadasa Stadium) टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या (T20 World Cup 2026) या हायव्होल्टेज सामन्यात भारताची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

Ishan Kishan Batting

पण त्यानंतर मैदानात आलेल्या ईशान किशनने (Ishan Kishan) सूत्रं हाती घेतली. त्याने पाकिस्तानी गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. अवघ्या ४० चेंडूत ७७ धावांची स्फोटक खेळी करत त्याने मैदानाचा कोपरा न् कोपरा गाजवला. त्याच्या या खेळीत १० सणसणीत चौकार आणि ३ गगनभेदी षटकारांचा समावेश होता.

तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करत ईशान भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेत होता. वाटलं होतं आज ईशान शतक ठोकणारच… पण नवव्या षटकात घात झाला! सईम अयुबच्या (Saim Ayub) गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ईशानने थोडी गडबड केली. चेंडू समजून घेण्याआधीच तो मागे सरकला आणि तिथेच त्याची विकेट पडली. ईशान बाद होताच पाकिस्तानने सुटकेचा निश्वास टाकला, पण तोवर त्याने भारताचा पाया मजबूत केला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही