📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

राजपाल यादव १० दिवसांत जेलबाहेर? सलमानने फिरवली ‘ती’ चक्रं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

राजपाल यादव जेलमधून सुटल्याचा आणि सलमान खानचे आभार मानतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण सत्य काही वेगळंच आहे, जाणून घ्या यामागची खरी हकीकत.

Published On: 

Rajpal Yadav Viral Video: सलमानच्या मदतीने सुटका? सत्य जाणून घ्या

🕒 1 min read

पडद्यावर आपल्या अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘छोट्या पंडित’वर खऱ्या आयुष्यात मात्र रडण्याची वेळ आलीये, हे आपण सर्वच जाणतो. चेक बाऊन्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या तुरुंगात आहेत. पण, अचानक सोशल मीडियावर एक व्हिडिओ असा काही व्हायरल झालाय की, ज्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. “सलमान भाईंनी (Salman Khan) मदत केली आणि राजपाल यादव सुटले,” अशा चर्चांना या व्हिडिओमुळे उधाण आलंय. भावनांच्या भरात या व्हिडिओवर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या.

सोशल मीडियावर (Social Media) फिरणाऱ्या या व्हिडिओत राजपाल यादव तुरुंगातून बाहेर आल्याचा आनंद व्यक्त करताना दिसतायत. एवढंच नाही तर “सलमान भाई मोठ्या भावासारखे आहेत, ते नेहमी मदतीला धावून येतात,” असं म्हणत त्यांनी भाईजानचे आभारही मानलेत. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला खरा, पण सावधान! हा व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे.

Rajpal Yadav Viral Video

आमच्या पडताळणीत समोर आलंय की, राजपाल यादव अजूनही तुरुंगातच आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आजचा नसून चक्क २०१८ सालचा जुना व्हिडिओ आहे, जो आता पुन्हा चुकीच्या संदर्भाने पसरवला जात आहे.

२०१० मध्ये ‘अता पता लापता’ या सिनेमासाठी राजपाल यांनी ५ कोटींचे कर्ज घेतले होते. दुर्दैवाने सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला आणि कर्जाचा डोंगर वाढत जाऊन आकडा ९ कोटींवर पोहोचला. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. सध्या अजय देवगण (Ajay Devgn), वरुण धवन आणि सोनू सूद यांसारखे स्टार्स मदतीसाठी पुढे आल्याच्या चर्चा आहेत, पण अद्याप राजपाल यांच्या सुटकेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जुन्या व्हिडिओवर विश्वास ठेवून अफवा पसरवू नका.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!