📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

प्रत्येक पिवळ सोनं नाही… तुम्ही खरेदी करताय ते सोने-चांदी किती शुद्ध? ‘हा’ ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या चेक करा

सोनं-चांदी खरेदी करताना फसवणूक टाळायचीय? BIS Care App द्वारे घरबसल्या सोन्याची शुद्धता कशी तपासायची, जाणून घ्या सोप्या स्टेप्समध्ये.

Published On: 

Check Gold Purity: सोनं अस्सल की बनावट? मोबाईलवर ओळखा!

🕒 1 min read

‘चकाकते ते सोनं नसतं’, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकतोय. पण आजकाल सोन्या-चांदीचे भाव (Gold-Silver Rate) ज्या वेगाने गगनाला भिडलेत, अशा वेळी फसवणूक झाली तर? कष्टाचे पैसे पाण्यात जायला वेळ लागणार नाही. तुम्ही ज्या सराफाकडून दागिने घेताय, ते सोनं नक्की किती कॅरेटचं (Check Gold Purity) आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल, तर आता काळजी करू नका. तुमच्या खिशातला मोबाईलच आता सोन्याची ‘खरी’ किंमत सांगणार आहे.

सध्या बाजारात बनावट दागिन्यांचा सुळसुळाट वाढला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने हॉलमार्किंग (Hallmarking) बंधनकारक केले आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या नियमांनुसार, सोन्याच्या दागिन्यांवर आता शुद्धतेची मोहर असते.

Check Gold Purity In Mobile App

सप्टेंबर २०२५ पासून तर चांदीच्या दागिन्यांवरही BIS लोगो आणि युनिक आयडी (HUID) अनिवार्य करण्यात आला आहे. पण सामान्य ग्राहकांनी हे ओळखायचं कसं? यासाठी सरकारने ‘BIS Care App’ हे ब्रह्मास्त्र ग्राहकांच्या हाती दिलंय. दागिन्यावर असलेला ६ अंकी HUID क्रमांक या ॲपमध्ये टाकला की, समोर सोन्याची पूर्ण जन्मकुंडलीच येते!

दागिना कोणत्या सराफाने बनवला?

हॉलमार्किंग सेंटर कुठलं?

सोनं किती कॅरेट शुद्ध आहे? (उदा. 22K916)

शुद्धतेचे निकष काय?

सोन्यासाठी सध्या ६ ग्रेड निश्चित आहेत: 14K, 18K, 20K, 22K, 23K आणि 24K. तर चांदीसाठी 800 ते 999 पर्यंत ७ ग्रेड आहेत. त्यामुळे दुकानात गेल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा, मोबाईल काढा आणि ‘Verify HUID’ पर्यायावर क्लिक करून खात्री करा. आपली फसवणूक टाळण्यासाठी हा छोटासा डिजिटल प्रयोग नक्की करा!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!