Share

महाशिवरात्री २०२६: शंकराच्या पिंडीवर पाणी वाहण्याची ‘ही’च ती योग्य वेळ; फक्त ५२ मिनिटांचा मुहूर्त का आहे खास?

महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करण्यासाठी ५२ मिनिटांचा ‘निशिता काळ’ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तुमची पूजा सफल करण्यासाठी जाणून घ्या ही अचूक वेळ.

Published On: 

Mahashivratri 2026 Muhurat: जलाभिषेकासाठी फक्त ५२ मिनिटं! पाहा अचूक वेळ

तुम्ही मंदिरात दर्शनासाठी दिवसभरात कधीही जा, पण अभिषेकाची खरी आध्यात्मिक अनुभूती आणि फळ एका विशिष्ट वेळेतच मिळतं, हे तुम्हाला माहितीये का? महाशिवरात्रीला (Mahashivratri 2026) शंकराची पूजा करताना वेळेचं भान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण एक विशिष्ट प्रहर असा असतो जेव्हा खुद्द महादेव निराकारातून साकार होतात. आज, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हा योग जुळून आला आहे.

हिंदू पंचांगानुसार, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी ‘निशिता काळ’ हा सर्वात प्रभावी मानला जातो. यंदा हा मुहूर्त भाविकांसाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे. शास्त्रांनुसार, १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ०९ मिनिटांनी निशिता काळ सुरू होईल आणि रात्री १ वाजून ०१ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच, तुमच्याकडे शंकराला प्रसन्न करण्यासाठी फक्त ५२ मिनिटांचा कालावधी आहे. याच काळात केलेला जलाभिषेक किंवा मंत्र जप हजारो पटीने फलदायी ठरतो, अशी मान्यता आहे.

Mahashivratri 2026 Muhurat

ज्यांना मध्यरात्रीची पूजा शक्य नाही, त्यांच्यासाठीही प्रहरानुसार वेळा ठरल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ६:११ ते ९:२३ हा पहिल्या प्रहरचा मुहूर्त आहे. तर दुसऱ्या प्रहरची पूजा रात्री ९:२३ ते १२:३५ या वेळेत करता येईल. तिसरा प्रहर, जो सर्वात महत्त्वाचा मानला जातो, तो मध्यरात्री १२:३५ ते ३:४७ पर्यंत असेल. पहाटेच्या वेळी म्हणजेच चौथ्या प्रहरात ३:४७ ते ६:५९ या वेळेतही अभिषेक करता येईल.

महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी, दूध किंवा गंगाजल का वाहावे? तर यामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात सुख-शांती हवी असेल, तर आजच्या या खास मुहूर्ताची नक्की नोंद करून ठेवा.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही