Share

उदित नारायण पुन्हा वादात; दारू पार्टीच्या VIDEO मुळे ट्रोल, गणपतीचा फोटो पाहताच नेटकऱ्यांचा संताप!

उदित नारायणचा मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गणपतीच्या फोटोसमोर पार्टी केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. आधीच पत्नीच्या आरोपांमुळे गायक चर्चेत होता.

Published On: 

Udit Narayan Trolled: दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल; गणपतीच्या फोटोवरून वाद!

एका बाजूला गंभीर कौटुंबिक आरोप आणि दुसऱ्या बाजूला आता हा नवीन व्हिडिओ… बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) यांच्या अडचणी काही केल्या संपत नाहीयेत. पत्नीच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या उदित नारायण यांना आता एका पार्टी व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. नेटकऱ्यांनी जेव्हा व्हिडिओच्या बॅकग्राउंडला पाहिलं, तेव्हा एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ट्रोलिंग सुरू झालं.

उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ गायक अभिजीत भट्टाचार्यच्या (Abhijeet Bhattacharya) वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. अभिजीतचा मुलगा जय याने हा व्हिडिओ शूट केल्याचं समजतंय. व्हिडिओमध्ये उदित नारायण, अभिजीत आणि संगीतकार जतिन पंडित ‘पहला नशा, पहला खुमार’ हे गाणं गाताना दिसत आहेत. पण गाण्यापेक्षा जास्त चर्चा तिथे सुरू असलेल्या ‘मद्यपाना’ची झाली.

Udit Narayan Trolled

या व्हिडिओमध्ये सर्वजण एन्जॉय करत आहेत, ड्रिंक्स घेत आहेत. मात्र, त्यांच्या मागे भिंतीवर भगवान गणेशांचा फोटो स्पष्ट दिसत आहे. देवाच्या फोटोसमोरच दारू पार्टी सुरू असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. “वाढदिवस साजरा करा, पण देवाच्या फोटोचा तरी मान ठेवा,” अशा शब्दांत एका युजरने त्यांना झापलंय. तर काहींनी “तुम्ही लिजेंड आहात, हे वागणं शोभत नाही,” अशा कमेंट्स केल्या आहेत.

पत्नीच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत उदित नारायण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. त्यांची पहिली पत्नी रंजना नारायण झा (Ranjana Narayan Jha) यांनी नुकतेच अत्यंत गंभीर आरोप केले होते. “माझ्या परवानगीशिवाय उदितने माझे गर्भाशय काढून टाकले आणि मुंबईत येऊन दीपा नारायणशी दुसरं लग्न केलं,” असा दावा रंजना यांनी केला होता. या आरोपांवर उदित यांनी अद्याप मौन बाळगलं असलं तरी, आता या व्हायरल व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही