Share

भारतापेक्षा पाकिस्तानात ‘धुरंधर’ची क्रेझ; कराचीच्या बाजारात फक्त १६ रुपयांत सिनेमा लीक!

भारतीय सिनेमांवर बंदी असूनही पाकिस्तानात ‘धुरंधर’चा बोलबाला. कराचीच्या बाजारात फक्त १६ रुपयांत (५० पाकिस्तानी रुपये) विकली जातेय पायरेटेड कॉपी.

Published On: 

Dhurandhar Leaked in Pakistan: रणवीरचा सिनेमा कराचीमध्ये फक्त १६ रुपयांत!

पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर अधिकृतपणे बंदी आहे, हे आपण नेहमीच ऐकतो. पण सीमेपलीकडची ग्राउंड रिॲलिटी काही वेगळीच आहे, याचा धक्कादायक पुरावा पुन्हा एकदा समोर आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टार ‘धुरंधर’ (Dhurandhar) या सिनेमाने भारतात धुमाकूळ घातलाच, पण आता शेजारील पाकिस्तानातही या सिनेमाची एकच चर्चा आहे. विशेष म्हणजे, बंदी असूनही हा सिनेमा तिथे खुलेआम विकला जातोय आणि तेही चक्क कवडीमोल भावात!

न्यूझीलंडचा प्रसिद्ध युट्यूबर कार्ल रॉक (Karl Rock) सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्याने कराचीतील एका मार्केटचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये कार्ल एका डीव्हीडीच्या दुकानात जातो. तिथे दुकानदार त्याला लॅपटॉपवर चक्क ‘धुरंधर’चं पोस्टर दाखवतो. “पाकिस्तानात भारतीय सिनेमा बॅन आहेत, पण इथे बघा काय सापडलंय,” असं कार्ल आश्चर्याने सांगतो. तिथे या स्पाय थ्रिलरच्या पायरेटेड कॉपीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.

 Dhurandhar Leaked in Pakistan

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या पायरेटेड कॉपीची किंमत. जेव्हा कार्लने त्या डीव्हीडीचा भाव विचारला, तेव्हा दुकानदाराने ५० पाकिस्तानी रुपये सांगितले. म्हणजेच, भारतीय चलनानुसार फक्त १६ रुपये! एवढ्या स्वस्त दरात तिथे हा सिनेमा उपलब्ध आहे. यावेळी कार्लने रणवीर सिंहच्या सिंधी कनेक्शनचाही (Sindhi Connection) उल्लेख केला. “रणवीर मुळचा सिंधी आहे आणि त्याचे आजी-आजोबा याच शहरातून फाळणीवेळी भारतात गेले होते,” अशी आठवण त्याने करून दिली.

हा व्हिडिओ समोर आल्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा सिनेमा भारतापेक्षा पाकिस्तानात जास्त हिट झालाय,” अशी उपरोधिक कमेंट एका युजरने केली आहे. एकंदरीत काय, तर सातासमुद्रापार गाजलेला ‘धुरंधर’ पाकिस्तानातही चोरून का होईना, पण हाउसफुल्ल गर्दी खेचतोय हे नक्की.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही