🕒 1 min read
मुंबई – तब्बल १८१३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करणारा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये पाहायला चुकलात का? तसं असेल तर आता वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. बॉक्स ऑफिसवर तब्बल ७७ दिवस अधिराज्य गाजवल्यानंतर रणवीर सिंहचा बहुचर्चित ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ आता थेट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर धडकला आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय-ॲक्शन सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीचे सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढलेत. आता हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत असून, प्रेक्षकांना घरबसल्या या अॅक्शनचा थरार अनुभवता येणार आहे.
‘धुरंधर २’ OTT रिलीज: ३ मिनिटांचे अनकट सीनही पाहायला मिळणार
४ जूनला संध्याकाळी ७ वाजल्यापासून हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, सेन्सॉरच्या कात्रीत अडकलेले काही मूळ संवाद आणि थिएटरमध्ये न दाखवलेले ३ मिनिटांचे अतिरिक्त दृश्य या OTT व्हर्जनमध्ये (Dhurandhar 2) पाहायला मिळतील. त्यामुळे सिनेमाची एकूण लांबी आता ३ तास ५२ मिनिटे झाली आहे.
कमाईचे आकडे पाहिले तर कुणाचेही डोळे विस्फारतील. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात या चित्रपटाने १३७५ कोटी, तर परदेशात ४३८ कोटी रुपये छापले आहेत. जगभरातील ५ लाख २७ हजार शोजमधून तब्बल १८१३.०४ कोटींचा गल्ला जमवत हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरलाय.
रणवीर सिंहने यात भारतीय हेराची भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. त्याच्यासोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्याही तगड्या भूमिका आहेत. हिंदीसह तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा थरार अनुभवता येईल. दरम्यान, १९ मार्च २०२६ रोजी आलेला याचा पहिला भागही याच प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आधीपासूनच उपलब्ध आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
- जेजुरी गडावरील ‘भंडारा म्हणजे शुद्ध हळद’ म्हणून जाहीर करा; विक्रम पाचपुते यांची तुकाराम मुंढेंकडे मागणी
- “हे अत्यंत लज्जास्पद आहे”, शिल्पा शिंदेवर भडकली हिना खान, टीव्ही इंडस्ट्रीत मोठी खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












