📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

अक्षयने मृणालला भर कार्यक्रमात छेडलं; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने ‘ते’ सत्य सांगितलं!

धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरने अखेर मौन सोडले आहे. अक्षय कुमारच्या शोमध्ये तिने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा मोठा खुलासा केला.

Published On: 

Mrunal Thakur Relationship: अक्षयचा प्रश्न अन् मृणालचा 'तो' खुलासा!

🕒 1 min read

सोशल मीडियावर सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे… मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) खरंच लग्न करणार? या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता खुद्द अक्षय कुमारनेच (Akshay Kumar) या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला आहे. ‘दो दिवाने शहर में’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेल्या एका किस्स्यानं सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय.

नुकताच मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा ‘दो दिवाने शहर में’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची टीम अक्षय कुमारच्या ‘व्हील ऑफ फॉर्च्यून’ (Wheel of Fortune) शोमध्ये पोहोचली होती.

Mrunal Thakur Relationship

तिथे खिलाडी कुमारने आपल्या नेहमीच्या खोडकर शैलीत मृणालला थेट प्रश्न विचारलाच! “मृणाल, सोशल मीडियावर तुझ्याबद्दल खूप चर्चा आहे, तुझं सध्याचं नेमकं Relationship Status काय आहे?” अक्षयच्या या गुगलीवर मृणालनेही क्षणाचाही विचार न करता रोखठोक उत्तर दिलं. ती म्हणाली, “मी सध्या सिंगल आहे आणि मिंगल होण्यासाठी तयार आहे.”

मृणालच्या या एका वाक्याने धनुषसोबतच्या लग्नाच्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. गंमत म्हणजे, मृणालचं हे उत्तर ऐकून अक्षयने लगेच प्रेक्षकांमधल्या एकाला उभं केलं, पण त्या व्यक्तीने “माझं लग्न झालंय,” असं सांगताच एकच हशा पिकला. त्यावर अक्षयने, “अरे, मी तुला मिंगल व्हायला नाही बोललो,” अशी कोटी करत वातावरण हलकंफुलकं केलं.

दरम्यान, रवी उदयवार दिग्दर्शित आणि भन्साळी प्रॉडक्शनचा ‘दो दिवाने शहर में’ हा रोमँटिक ड्रामा येत्या २० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मृणालने लग्नाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी, तिचं हे ‘मिंगल’ होण्याचं वक्तव्य नेटकऱ्यांमध्ये मात्र चांगलंच व्हायरल होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!